महाराष्ट्रातील उद्योग सुलभता
उद्योग सुलभता (EoDB) हा भारत सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापाराच्या (DPIIT) प्रोत्साहन विभागाचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. भारतातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नियामक आणि माहिती तंत्रज्ञानसंबंधी बदल आवश्यक असणाऱ्या विविध सुधारणात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीच्या माध्यमातून अनुकूल व्यावसायिक परिसंस्था विकसित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. डीपीआयआयटी’ द्वारे दरवर्षी या सुधारणा आणल्या जातात, आणि नंतर त्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश अंमलात आणतात. त्यानंतर डीपीआयआयटी’ द्वारे त्यांचे मूल्यांकन केले जाते आणि क्रमवारी ठरवली जाते.
उद्योग सुलभता २०२२:
डीपीआयआयटी’ने सामायिक केलेल्या उद्योग सुधारणा कृती योजना (बीआरएपी) २०२२ च्या आधारे २०२२ या वर्षासाठी उद्योग सुलभता (EoDB) उपक्रम राबविला जातो आहे. या वर्षाच्या उद्योग सुलभता उपक्रमात दोन आराखड्यांचा समावेश आहे, कृती आराखडा अ – यात उद्योग-विशिष्ट सुधारणांचा समावेश आहे तर कृती आराखडा ब – यात नागरिक-केंद्रित सुधारणांचा समावेश आहे
‘उद्योग समागम २०२४’ मध्ये उद्योग सुलभता उपक्रम २०२२ मध्ये महाराष्ट्राला ‘टॉप अचिव्हर्स’ श्रेणीमध्ये स्थान मिळाले आहे.
जगण्यातील सुलभता:
- नव्याने सादर केलेल्या संकल्पनेमध्ये नागरिक-केंद्रित सेवांचा समावेश आहे (उदाहरणार्थ: जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, वाहनचालक परवाना, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, शिधापत्रिका इ.)
- आवश्यक सुधारणा:
- सेवेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया, सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे आणि शुल्क रचना यांचा समावेश असलेल्या दस्तऐवजाचे ऑनलाइन प्रकाशन
- ऑनलाइन अर्ज, ऑनलाइन पेमेंट, ऑनलाइन स्थितीचा मागोवा आणि प्रमाणपत्र डाउनलोड अशा वैशिष्ट्यांसह सेवा वितरणासाठी ऑनलाइन प्रणालीचे विकसन
- नागरिकांसाठी राज्यस्तरीय एकल खिडकी यंत्रणेमध्ये सेवांचा समावेश (उदाहरणार्थ: महाराष्ट्राच्या बाबतीत आपले सरकार)
- महाराष्ट्र सार्वजनिक सेवा हक्क अधिनियमांतर्गत सेवा वितरण कालमर्यादेची अधिसूचना
- सेवा प्रदान करण्याच्या संदर्भात विभागाची कामगिरी दर्शविणाऱ्या डॅशबोर्डची अंमलबजावणी
उद्योग सुलभता २०२२ उपक्रमांतर्गत सुधारणांच्या स्वीकृतीची व्याप्ती खालीलप्रमाणे आहे (डीपीआयआयटी’ द्वारे मूल्यांकन):
अ.क्र. | कृती आराखडा | मंजूर | नामंजूर | एकूण |
---|---|---|---|---|
1 | A (EoDB) |
261 | 0 | 261 |
100.00% | ||||
2 | B (EoL) |
90 | 1 | 91 |
98.90% | ||||
गोळाबेरीज | 351 | 352 | ||
99.72% |
उद्योग सुलभता २०२४:
राज्यांशी सल्लामसलत करण्यासाठी डीपीआयआयटी’ने ९ नोव्हेंबर २०१३ रोजी व्यवसाय सुधारणा कृती आराखडा (BRAP) २०२४ चा मसुदा जारी केला. या मसुद्यात दोन कृती योजनांचा समावेश आहे:
कृती आराखडा अ: केंद्रीय मंत्रालये आणि विभागांशी संबंधित सुधारणा
कृती आराखडा ब: राज्यांशी संबंधित सुधारणा
त्यानंतर १ फेब्रुवारी २०२४ रोजी डीपीआयआयटी’ने बीआरएपी २०२४ ची अंतिम आवृत्ती सामायिक केली.
कृती आराखडा अ मध्ये ५७ सुधारणा मुद्द्यांचा समावेश आहे, तर कृती आराखडा ब मध्ये २८७ सुधारणा मुद्द्यांचा समावेश आहे.
अनेक राज्यांमधील निवडणुकांमुळे आणि त्यानंतर राज्यांनी उद्योग सुलभतेसाठीची मुदत वाढवण्याबाबत केलेल्या विनंतीची दखल घेत डीपीआयआयटी’ने ती विनंती मान्य केली आणि उद्योग सुलभता २०२४ उपक्रमाचा एक भाग म्हणून अनेक सुधारणांची भर घातली.
२३ ऑक्टोबर २०२४ रोजी आयोजित व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून डीपीआयआयटी’ने बीआरएपी+ 2024 उपक्रमांतर्गत ७० अतिरिक्त सुधारणा मुद्द्यांबाबत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना माहिती दिली. त्याचबरोबर उद्योग सुलभते अंतर्गत ‘रिड्युसिंग कम्प्लायन्स बर्डन (RCB) प्लस २०२४ हे वैशिष्ट्य समाविष्ट करण्यात आले आहे, ज्यामध्ये ओळख, सुलभीकरण, अनावश्यकता दूर करणे, डिजिटायझेशन तसेच बोजड अनुपालन/तरतुदींचे वैधीकरण करणे यासाठी राज्य/केंद्रशासित प्रदेशांकडून प्रमाणपत्र आवश्यक आहे. या सुधारणांच्या अंमलबजावणीची आणि पुरावे सादर करण्याची कालमर्यादा १५ फेब्रुवारी २०२५ आहे, तर वापरकर्ता डेटा सादर करण्याची अंतिम मुदत १५ जानेवारी २०२५ पर्यंत आहे.
१७१ सुधारणांची द्विरूक्ती झाली असून ८३ सुधारणा मागील आवृत्तीतल्या आहेत तर १०३ सुधारणा नव्याने सादर करण्यात आल्या आहेत, असे कृती आराखडा ब अंतर्गत सुधारणा मुद्द्यांचे वर्गीकरण केल्यावर आढळून आले.
बीआरएपी २०२४ मधील काही प्रमुख निरीक्षणे खालीलप्रमाणे आहेत:
- i. 83 सुधारित सुधारणा, १०४ नवीन सुधारणा, १९ विभाग आणि ३१ उप-विभागांचा समावेश
- ii. चार नवीन विभाग: वन, कौशल्य विकास आणि उद्योजकता विकास, जलस्रोत, पाणी पुरवठा आणि स्वच्छता
७ नवीन सेवा : नदी/सार्वजनिक टाक्यांमधून पाणी काढण्याची परवानगी, पाणीपुरवठा संस्थेकडून पाणी उपलब्ध नसल्याचा दाखला, वृक्ष प्राधिकरण/योग्य प्राधिकरणाकडून वृक्षतोडीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र, वृक्ष वाहतुकीची परवानगी, लिफ्ट/एस्केलेटर बसवण्यासाठी नोंदणी आणि नूतनीकरण, तात्पुरती वीज जोडणी, भार वाढण्यासाठी विद्युत सुरक्षा ना-हरकत प्रमाणपत्र, सांडपाणी जोडणी घेणे - iii. एनएसडब्ल्यूएस वर लक्षणीय भर
- iv. क्षेत्रनिहाय प्रगती एनएसडब्ल्यूएस वर प्रकाशित करावी
- v. गती शक्ती मध्ये एका सुधारणेचा समावेश
- vi. बीआरएपी २०२४ मध्ये नियामक अनुपालन आणि वैधीकरणाचा समावेश
डीपीआयआयटी द्वारे खालील उपक्रम राबविण्यात यावेत:
- सुधारणेच्या मुद्द्यांना प्राधान्यक्रम देणे तसेच ‘सामान्य’ आणि ‘वापरकर्ता निहाय’ असे वर्गीकरण करणे
- बीआरएपी २०२४ चे मूल्यांकन
- वापरकर्ता सर्वेक्षण
- मूल्यांकनाचा निकाल
या उपक्रमांतर्गत पुढील टप्प्यांची कालमर्यादा खाली नमूद केल्याप्रमाणे आहे:
- अंमलबजावणी कालावधी: १ फेब्रुवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२५
- पुरावा सादर करणे: १ फेब्रुवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२५
- वापरकर्ता डेटा सादरीकरण: १६ ऑक्टोबर २०२४ ते १५ जानेवारी २०२५
अ. क्र. | उपविभाग | कायद्याचे नाव | सुधारणांची संख्या |
---|---|---|---|
१ | कामगार आयुक्तालय | महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना कायदा, १९४८ | ५ |
२ | वेतन देय कायदा, १९३६ | ५ | |
3 | किमान वेतन कायदा, १९४८ | ५ | |
४ | इमारत आणि इतर बांधकाम कामगार (रोजगाराचे नियमन आणि सेवा शर्ती) अधिनियम, १९९६ | ५ | |
५ | कंत्राटी कामगार (नियमन आणि निर्मूलन) कायदा, १९७० | ५ | |
६ | आंतरराज्य स्थलांतरित कामगार (नियमन. रोजगार आणि सेवा शर्ती) अधिनियम, १९७९ | ५ | |
७ | मातृत्व लाभ कायदा, १९६१ | ५ | |
८ | पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी कायदा, १९७२ | ५ | |
9 | बाष्पके संचालनालय | बाष्पके कायदा, १९२३ | ५ |
१० | एमपीसीबी | पाणी (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) अधिनियम, १९७४ | ५ |
११ | वायु (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, १९८१ | ५ | |
१२ | प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम, २०१६ | ५ | |
१3 | सहकार | महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० | ५ |
१४ | धर्मादाय आयुक्त | सोसायटी नोंदणी कायदा, १८६० | ५ |
१५ | डीजीएम |
खाणी आणि खनिजे (विकास आणि नियमन) कायदा, |
५ |
१६ | LM | वैधमापन कायदा, २००९ | ५ |
१७ | डीएमए | महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ | ५ |
१८ | उत्पादन शुल्क | महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ | ५ |
१9 | नोंदणी व मुद्रांक | नोंदणी कायदा, १९०८ | ५ |
२० | शेती | कीटकनाशक कायदा, १९६८ | ५ |
२१ | अन्न आणि औषध प्रशासन | औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० | ५ |
२२ | ऊर्जा | उर्जा कायदा, २००३ | ५ |
२3 | एमएसएसआयडीसी | सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास कायदा, २००६ | ५ |
एकूण | ११५ |
महत्वाची कामगिरी
1. मैत्री:
- महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा अधिनियम, २०२३ ची अंमलबजावणी
- मैत्री एकल-खिडकी यंत्रणेमध्ये एकूण ११९ सेवांचा समावेश; महसूल, उत्पादन शुल्क, एमपीसीबी, बाष्पकांच्या नव्याने समाविष्ट सेवांचाही समावेश
- राष्ट्रीय एकल खिडकी यंत्रणेमध्ये मैत्रीचा समावेश
- उद्योगाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या, शासनातर्फे उद्योगांना दिल्या जाणाऱ्या सेवा जाणून घेण्यासाठी गुंतवणूकदाराला मदत करण्यासाठी ऑनलाइन ‘विझार्ड’ मॉड्यूलची अंमलबजावणी (सध्या सुधारणांच्या अधीन)
- मैत्रीच्या माध्यमातून अर्ज केलेल्या सेवांच्या संदर्भात, सादर केलेले अर्ज, प्रक्रिया केलेले अर्ज, सरासरी वेळ’ इ. तपशिलाचा समावेश असणाऱ्या सर्वसमावेशक डॅशबोर्डची अंमलबजावणी
- विभागांना धोरणे, कायदे, नियमांचे मसुदे अपलोड करण्यासाठी, तसेच नागरिकांकडून सूचना मागविण्यासाठी ऑनलाइन ‘पब्लिक कन्सल्टेशन मॉड्यूल’ची अंमलबजावणी
2. एमआयडीसी:
- ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध जमिनीच्या माहितीची तरतूद
- जोडणीसाठी उपलब्ध पायाभूत सुविधांचे (रस्ते, रेल्वे, विमानतळांसह) तपशील, उपयुक्त पायाभूत सुविधांचे (इलेक्ट्रिकल सबस्टेशनसह) तपशील आणि इतर पायाभूत सुविधांचे तपशील (पोलीस स्टेशन, फायर स्टेशनसह), रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांचा समावेश असणाऱ्या जीआयएस प्रणालीची अंमलबजावणी
- इंडिया इंडस्ट्रियल लँड बँक (IILB) प्रणालीसह एमआयडीसी जीआयएस चा समावेश
- मैत्री एकल-खिडकी यंत्रणेमध्ये ‘जमीन वाटप’ प्रणालीचा समावेश
3. एमपीसीबी:
- मैत्री एकल-खिडकी यंत्रणेमध्ये ‘हवा (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) कायदा, १९८१ आणि पाणी (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) अधिनियम, १९७४ अंतर्गत स्थापनेसाठी संमती’ चा समावेश
- मैत्री एकल-खिडकी यंत्रणेमध्ये ‘धोकादायक आणि इतर कचरा (व्यवस्थापन आणि सीमापार हालचाली) नियम, २०१६ अंतर्गत प्राधिकरणा’ चा समावेश
- मैत्री एकल-खिडकी यंत्रणेमध्ये ई-कचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियम, २०११ अंतर्गत नोंदणी/नूतनीकरणाचा समावेश
- मैत्री एकल-खिडकी यंत्रणेमध्ये ‘प्लास्टिक कचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियम, २०११ अंतर्गत नोंदणी/नूतनीकरणा’ चा समावेश
- मैत्री एकल-खिडकी यंत्रणेमध्ये ‘जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियम, २०१६ अंतर्गत प्राधिकरणाचा समावेश
- मैत्री एकल-खिडकी यंत्रणेमध्ये ‘घनकचरा व्यवस्थापन (प्रक्रिया, पुनर्वापर, उपचार आणि विल्हेवाट) नियम, २०१६ अंतर्गत प्राधिकरणाचा समावेश
- मैत्री एकल-खिडकी यंत्रणेमध्ये ‘बांधकाम आणि विघातक कचरा व्यवस्थापन (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियम, २०१६ अंतर्गत प्राधिकरणा’ चा समावेश
- मैत्री एकल-खिडकी यंत्रणेमध्ये ‘द बॅटरीज (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियम, २००१ अंतर्गत डीलर्ससाठी नोंदणी’ चा समावेश
- निरीक्षण-विशिष्ट डॅशबोर्डसह केंद्रीय तपासणी प्रणालीसह अनुपालन तपासणीचा समावेश
- स्व-प्रमाणनावर आधारित (जल कायदा, १९७४ आणि हवाई कायदा, १९८१ अंतर्गत) परिचालनासाठी संमतीचे नूतनीकरण
4. अन्न आणि नागरी पुरवठा – वैध मापन:
- मैत्री एकल-खिडकी यंत्रणेमध्ये ‘वैध मापन/वजने आणि मापे’ अंतर्गत नोंदणी, नूतनीकरण आणि पडताळणीचा समावेश
- वैध मापन कायद्यांतर्गत परवान्यांचे स्वयं-नूतनीकरण करण्याची तरतूद
- निरीक्षण-विशिष्ट डॅशबोर्डसह केंद्रीय तपासणी प्रणालीसह अनुपालन तपासणीचा समावेश
5. बाष्पके संचालनालय:
- मैत्री एकल-खिडकी यंत्रणेमध्ये ‘बाष्पके उत्पादकांच्या नोंदणी’चा समावेश
- निरीक्षण-विशिष्ट डॅशबोर्डसह केंद्रीय तपासणी प्रणालीसह अनुपालन तपासणीचा समावेश
6. राज्य उत्पादन शुल्क:
- मैत्री एकल-खिडकी यंत्रणेमध्ये ‘उत्पादन शुल्क पडताळणी प्रमाणपत्रा’चा समावेश
- मैत्री एकल-खिडकी यंत्रणेमध्ये ‘राज्य उत्पादन शुल्क अंतर्गत लेबल नोंदणीसाठी नोंदणी’चा समावेश
7. कामगार – कामगार आयुक्तालय:
- मैत्री एकल-खिडकी यंत्रणेमध्ये कंत्राटी कामगार (नियमन आणि निर्मूलन) कायदा, १९७० अंतर्गत ‘कंत्राटदारांसाठी परवाना’ आणि ‘कंत्राटदारांसाठी परवान्याचे नूतनीकरण’ ‘या बाबींचा समावेश
- मैत्री एकल-खिडकी यंत्रणेमध्ये ‘दुकाने आणि आस्थापना कायद्यांतर्गत नोंदणी’चा समावेश
- मैत्री एकल-खिडकी यंत्रणेमध्ये ‘इमारत आणि इतर बांधकाम कामगार (रोजगार आणि सेवा शर्तींचे नियमन) अधिनियम, १९९६ अंतर्गत नोंदणी’ चा समावेश
- मैत्री एकल-खिडकी यंत्रणेमध्ये ‘आंतरराज्य स्थलांतरित कामगार (RE&CS) कायदा, १९७९ अंतर्गत स्थापनेच्या नोंदणी’ चा समावेश
- ‘कामगार कायद्यांतर्गत सिंगल इंटिग्रेटेड रिटर्न ऑनलाइन भरण्याची’ तरतूद
- दुकाने आणि आस्थापना कायद्यांतर्गत नूतनीकरणाची आवश्यकता नाही
- आंतरराज्यीय स्थलांतरित कामगार कायदा, कंत्राटी कामगार कायदा तसेच इमारत आणि इतर बांधकाम कामगार कायदा अंतर्गत देऊ केलेल्या सेवांसाठी अधिसूचित कालमर्यादा संपल्यानंतर ‘मानीव नोंदणी आणि नूतनीकरणा’च्या तरतुदीची अंमलबजावणी
- निरीक्षण-विशिष्ट डॅशबोर्डसह केंद्रीय तपासणी प्रणालीसह अनुपालन तपासणीचा समावेश
8. कामगार – डीआयएसएच:
- मैत्री एकल-खिडकी यंत्रणेमध्ये ‘कारखाना परवाना’ आणि ‘परवान्याचे नूतनीकरण’ सेवांचा समावेश
- मैत्री एकल-खिडकी यंत्रणेमध्ये ‘कारखाना आराखडा मंजुरी’चा समावेश
- मैत्री एकल-खिडकी यंत्रणेमध्ये ‘कारखाना परवाना’ आणि ‘परवान्याचे नूतनीकरण’ सेवांचा समावेश
- १० वर्षे वैध असणारा कारखाना परवाना मिळविण्याची तरतूद
- अधिसूचित कालमर्यादेची मुदत संपल्यानंतर कारखाना अधिनियम, १९४८ अंतर्गत कारखाना परवान्याच्या ‘मानीव नूतनीकरणा’च्या तरतुदीची अंमलबजावणी
- निरीक्षण-विशिष्ट डॅशबोर्डसह केंद्रीय तपासणी प्रणालीसह अनुपालन तपासणीचा समावेश
9. महसूल:
- राज्याच्या एकल-खिडकी यंत्रणेमध्ये उद्योग संबंधी सेवांसाठी ना हरकत परवानगी मॉड्यूलचा विकास आणि समावेश
- महाराष्ट्रात राष्ट्रीय सर्वसाधारण दस्तऐवज नोंदणी प्रणाली सक्षम (NGDRS) मालमत्ता नोंदणी प्रणाली
- महाराष्ट्रातील गेल्या २० वर्षांच्या रेकॉर्ड ऑफ राइट्सचे ऑनलाइन प्रकाशन
- संपूर्ण महाराष्ट्रातील भूकर नकाशांचे डिजिटायझेशन
- मालमत्ता नोंदणीनंतर मालमत्ता कर, पाणी कर आणि वीज जोडणीसंबंधीच्या नोंदींमध्ये स्वयंचलित पद्धतीने फेरफार करणाऱ्या प्रणालीचे विकसन
- संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही ठिकाणच्या जमिनींसाठी विशिष्ट मालमत्ता ओळख क्रमांक अनिवार्य करणे
- नागरिक आणि उद्योगांना मालमत्तेवरील अद्ययावत विविध भार विनामूल्य शोधण्यासाठी संबंधित प्राधिकरणाची प्रत्यक्ष भेट घ्यावी लागू नये, यासाठी एकात्मिक मालमत्ता नोंदणी पोर्टलचा विकास
- उप-निबंधक किंवा भूमी अभिलेख कार्यालयात मालमत्ता नोंदणीशी संबंधित तक्रारींसाठी स्वतंत्र तक्रार यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रणालीचा विकास
10. वस्तू आणि सेवा कर:
- मैत्री एकल-खिडकी यंत्रणेमध्ये ‘व्यावसायिक कराअंतर्गत नोंदणी’चा समावेश
- करदात्यांना आयकर परतावे भरण्याच्या कामी मदत करण्यासाठी सेवा केंद्रे
- वापरकर्त्यांना आयकर परतावे तयार करणे आणि ते भरण्यात मदत करणे अशा मूलभूत सेवा प्रदान करण्यासाठी हेल्पलाइन
11. अन्न आणि औषध प्रशासन:
- मैत्री एकल-खिडकी यंत्रणेमध्ये ‘किरकोळ औषध परवान्या’चा समावेश
- मैत्री एकल-खिडकी यंत्रणेमध्ये ‘घाऊक औषध (नोंदणी आणि नूतनीकरण) परवान्या’चा समावेश
- मैत्री एकल-खिडकी यंत्रणेमध्ये ‘औषध उत्पादन (नोंदणी आणि नूतनीकरण) परवान्या’चा समावेश
12. नगर विकास १:
- ‘इमारत आराखडा मंजुरी’साठी ऑनलाइन प्रणालीची अंमलबजावणी
- तपासणी प्रक्रिया आणि तपाससूचीचे ऑनलाइन प्रकाशन
- तपासणी तपाससूची पुरती मर्यादित करणे
- निरीक्षकांच्या संगणकीकृत वाटपाची तरतूद
13. नगर विकास २:
- मैत्री एकल-खिडकी यंत्रणेमध्ये ‘व्यापार परवान्या’चा समावेश
- मैत्री एकल-खिडकी यंत्रणेमध्ये ‘अग्निशमन-नाहरकत प्रमाणपत्रा’चा समावेश
- मैत्री एकल-खिडकी यंत्रणेमध्ये ‘जल जोडणी’चा समावेश
- मैत्री एकल-खिडकी यंत्रणेमध्ये ‘मोबाइल टॉवर मंजुरी’चा समावेश
- मालमत्ता कराची थकबाकी ऑनलाइन तपासण्याची तरतूद
- मालमत्ता कराची स्वयंचलित गणना आणि ऑनलाइन भरणा करण्याची सुविधा
- महाराष्ट्रातील सुमारे ३०० नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा (ULB) समावेश असलेल्या ULB-स्तरीय सेवांचा समावेश असलेल्या ‘इंटिग्रेटेड वेब-आधारित पोर्टल’ (IWBP) ची अंमलबजावणी
- सर्व प्रकारच्या मालमत्तांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात युनिक प्रॉपर्टी आयडी अनिवार्य
14. वीज:
- मैत्री एकल-खिडकी यंत्रणेमध्ये महावितरणच्या वीज जोडणी सेवेचा समावेश
- मैत्री एकल-खिडकी यंत्रणेमध्ये ‘डीजी सेट इन्स्टॉलेशनची मंजुरी’ चा समावेश
- केवळ वीज जोडणी मिळवण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे.
- – वापरकर्त्याच्या ओळखीचा पुरावा
- – मालकी / वहिवाटीचा पुरावा (मालकीच्या/भाडेतत्वावरील जागेच्या संदर्भात)
- – अधिकृतता दस्तऐवज (फर्म किंवा कंपनीच्या संदर्भात)
- ‘राइट ऑफ वे’ (RoW) आवश्यक नसेल अशा प्रकरणी सात दिवसांत वीजजोडणी आणि ‘राइट ऑफ वे’ (RoW) आवश्यक असेल अशा प्रकरणी १५ दिवसांत दिवसात वीजजोडणी
- वीज देयकाच्या ई-प्रदानाची तरतूद
- विविध भार शोधण्यासाठी एकात्मिक मालमत्ता नोंदणी पोर्टलवर महावितरणच्या ग्राहक तपशीलांचा समावेश
वर उल्लेख केलेल्या सेवांची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे:
- अ. अर्ज ऑनलाइन दाखल
- आ. ऑनलाइन भरणा
- इ. मैत्री एकल-खिडकी यंत्रणेद्वारे अर्जाचा मागोवा
- ई. प्रमाणपत्र ऑनलाइन डाउनलोड करण्याची तरतूद
- उ. अर्जांची विश्वासार्हता पडताळण्याची तरतूद
- ऊ. सादर केलेले अर्ज सर्वसमावेशक डॅशबोर्डवर सार्वजनिकरित्या उपलब्ध
- ऋ. अर्ज करण्याची प्रक्रिया, सेवेसाठीचे शुल्क, सादर करावयाची कागदपत्रे आणि सेवा प्रदान करण्याची कालमर्यादा या बाबींचे तपशील ऑनलाइन उपलब्ध