वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न – भारतात निर्यात उद्योग सुरू करण्यासाठीचे महत्वाचे टप्पे कोणते?

  • संस्थेची स्थापना: तुमच्या कंपनीसाठी आकर्षक नाव आणि लोगो निवडा.
  • बँक खाते उघडा: तुमचा पॅन क्रमांक प्राप्त केल्यानंतर अधिकृत विक्रेता श्रेणी १ अंतर्गत सूचीबद्ध असलेल्या कोणत्याही बँकेत बँक खाते उघडा. या बँका, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया (EXIM) सह, परदेशी पक्षांसोबत व्यवहार करू शकतात.
  • आयईसी संकेतांक प्राप्त करा: ज्या उद्योगांना वस्तूंची आयात किंवा निर्यात करायची आहे, त्यांच्यासाठी आयईसी संकेतांक अर्थात आयात आणि निर्यात संकेतांक (IEC) अनिवार्य आहे. हा परदेश व्यापार महासंचालनालयाने (DGFT) द्वारे जारी केलेला १०-अंकी विशिष्ट क्रमांक आहे.
  • आरसीएमसी प्राप्त करा: हे नोंदणी-सह-सदस्यत्व प्रमाणपत्र (RCMC) भारत सरकारने अधिकृत केलेल्या निर्यात प्रोत्साहन परिषदेअंतर्गत नोंदणीकृत उत्पादनांशी व्यवहार करणाऱ्या निर्यातदाराला प्रमाणित करते.
  • एकदा आयईसी आणि आरसीएमसी प्राप्त झाल्यानंतर, तुम्ही भारतात तुमचा आयात-निर्यात व्यवसाय अधिकृतपणे सुरू करू शकता.

प्रश्न – मी परदेशातील खरेदीदारांना कसे ओळखू शकतो?

  • बी-टू- बी पोर्टल्स, आयातदारांसाठी वेब ब्राउझिंग, व्यापार मेळावे आणि प्रदर्शनांमध्ये सहभाग अशा विविध स्रोतांद्वारे तुम्ही खरेदीदारांपर्यंत पोहोचू शकता.
  • निर्यात प्रोत्साहन परिषद (EPC), परदेशातील भारतीय मिशन्स, ओव्हरसीज चेंबर्स ऑफ कॉमर्स, तसेच मित्र आणि कुटुंबामार्फतही तुम्ही खरेदीदारांपर्यंत पोहोचू शकता.
  • व्यापारी संघटना, परिषद किंवा बिगर शासकीय संघटनांमध्ये सहभागी होणे आणि भारतीय दूतावासाशी संपर्क साधणे हे खरेदीदारांपर्यंत पोहोचण्याचे इतर प्रभावी मार्ग आहेत.

प्रश्न – जीएसटी अंतर्गत निर्यात दर कसे आकारले जातात?

  • सर्व प्रकारची निर्यात आंतर-राज्य पुरवठा म्हणून वर्गीकृत केली जाते आणि झीरो-रेटेड सप्लाय मानली जाते.
  • निर्यातदार एकतर बाँड/लेटर ऑफ अंडरटेकिंग (कर न भरता) निर्यात करू शकतात आणि इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) च्या परताव्याचा दावा करू शकतात किंवा इंटिग्रेटेड जीएसटी (IGST) भरू शकतात आणि भरलेल्या IGST च्या परताव्याचा दावा करू शकतात.

प्रश्न – निर्यात आणि आयात करण्यासाठी कोणती अनिवार्य कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • बिल ऑफ लॅडिंग / एअरवे बिल
  • व्यावसायिक चलन आणि पॅकिंग सूची
  • शिपिंग बिल
  • अतिरिक्त दस्तऐवजांमध्ये उत्पादनावर अवलंबून ना-हरकत प्रमाणपत्र/परवाना किंवा विशिष्ट प्रमाणपत्रे, तसेच फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र, आरोग्य प्रमाणपत्र किंवा औषध परवाना समाविष्ट असू शकतो.

प्रश्न – उत्पादनांची निर्यात करण्यासाठीची गुणवत्ता मानके काय आहेत?

  • निर्यात निरीक्षण परिषद (EIC) अनिवार्य गुणवत्ता नियंत्रण आणि निर्यात केल्या जाणाऱ्या मालाची तपासणी सुनिश्चित करते.
  • सूचक गुणवत्ता मानकांमध्ये खालील बाबी समाविष्ट आहेत:
    • आयएसआय मानक
    • AGMARK मानक
    • ISO 9000 मानक
    • बीआयएस हॉलमार्क

प्रश्न – निर्यात-केंद्रित एककांमध्ये (EOUs) निर्यातदार कोणते लाभ घेऊ शकतात?

  • निर्यात-केंद्रित एककांमध्ये निर्यातदार कच्चा माल किंवा भांडवली वस्तू आयात किंवा देशांतर्गत स्त्रोतांद्वारे शुल्कमुक्त मिळवू शकतात.
  • देशांतर्गत तेल कंपन्यांकडून खरेदी केलेल्या इंधनावरील जीएसटी प्रतिपूर्ती आणि शुल्क प्रतिपूर्तीसाठी ते पात्र आहेत.
  • त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करता येतो आणि फास्ट-ट्रॅक क्लिअरन्स सुविधाही प्राप्त होतात.
  • एसएसआय क्षेत्रासाठी आरक्षित वस्तूंच्या उत्पादनासाठी त्यांना औद्योगिक परवान्यातून सूट देण्यात आली आहे.

प्रश्न – भारतातील परकीय व्यापार धोरण काय आहे?

  • भारताचे परकीय व्यापार धोरण (FTP) निर्यात आणि व्यापाराला चालना देण्यासाठी एक आराखडा प्रदान करते. सध्याचे धोरण (२०२३-२०२८) विद्यमान उत्पादनांचा बाजारपेठेतील हिस्सा वाढविण्यावर तसेच नवीन बाजारपेठा आणि उत्पादनांचा शोध घेण्यावर लक्ष केंद्रित करते.
  • भारताचे परकीय व्यापार धोरण निर्यातदारांना जीएसटीचा लाभ घेण्यास, सीमा ओलांडून उद्योग सुलभ करण्यास तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) आणि श्रम-केंद्रित क्षेत्रांमधील निर्यातीला प्रोत्साहन देण्यास मदत करते.

प्रश्न – भारतात सीमाशुल्क काय आहे आणि त्याचे प्रकार काय आहेत?

  • सीमाशुल्क हा आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून मालाची वाहतूक करताना लादलेला कर आहे. देशाची अर्थव्यवस्था, नोकऱ्या, पर्यावरण आणि रहिवाशांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने हा कर आकारला जातो.
  • सीमाशुल्काच्या प्रकारांमध्ये खालील बाबी समाविष्ट आहेत:
    • मूलभूत सीमाशुल्क (BCD)
    • काउंटरवेलिंग ड्यूटी (CVD)
    • अतिरिक्त सीमा शुल्क (विशेष CVD)
    • प्रोटेक्टीव्ह ड्युटी
    • अँटी डंपिंग ड्युटी
    • सीमा शुल्कावरील शिक्षण उपकर

प्रश्न – ‘मोस्ट फेव्हर्ड नेशन’ (MFN) दर्जा काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत?

  • आंतरराष्ट्रीय व्यापारात, ‘मोस्ट फेव्हर्ड नेशन’ दर्जा म्हणजे त्या विशिष्ट देशाला सर्वात पसंतीचे राष्ट्र म्हणून त्या देशातील समान व्यापाराचे लाभ प्रदान करणे होय.
  • या लाभांमध्ये मोठ्या बाजारपेठेत प्रवेश, कमी व्यापार अडथळे आणि विकासाच्या जास्त संधींचा समावेश होतो. भारताच्या ‘मोस्ट फेव्हर्ड नेशन’ भागीदारांमध्ये बांगलादेश, मालदीव, नेपाळ आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे.

प्रश्न – निर्यातदारांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या कोणत्या प्रोत्साहन योजना आहेत?

  • केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना पायाभूत सुविधांच्या अभावातून मार्ग काढण्यास मदत करतात आणि निर्यातदारांना खालीलप्रमाणे सुविधा प्रदान करतात:
    • आर्थिक सहाय्य
    • व्याज समानीकरण योजना (IES)
    • भारतीय रिझर्व्ह बँकेची गोल्ड कार्ड योजना
    • निर्यात ऋण विकास योजना (NIRVIK)
    • ड्युटी ड्रॉबॅक योजना
    • उत्पादन शुल्कात सूट आणि माफी योजना
    • भारत योजनेतून व्यापारी मालाची निर्यात (MEIS)
    • भारत योजनेतून सेवा निर्यात (SEIS)
    • निर्यात उत्पादनांवर शुल्क आणि कर माफी (RoDTEP) योजना
    • निर्यात प्रोत्साहन भांडवली वस्तू (EPCG) योजना
    • निर्यात पत हमी योजना

प्रश्न – निर्यात करताना कोणत्या महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवल्या पाहिजेत?

  • सॅम्पलिंग: खरेदीदारांच्या मागणीवर आधारित सानुकूलित नमुने प्रदान केल्याने निर्यात ऑर्डर सुरक्षित करण्यात मदत होते.
  • निर्यात करारांचे मूल्य: सर्व निर्यात करार एकतर मुक्तपणे परिवर्तनीय चलनात किंवा भारतीय रुपयामध्ये असावेत, ज्यातून मिळणारे उत्पन्न परिवर्तनीय चलनात असावे.
  • किंमत/दर: किंमतीमध्ये सर्व खर्च समाविष्ट असावेत. जास्तीत जास्त नफा मार्जिनसह स्पर्धात्मक किमतीत जास्तीत जास्त प्रमाणात विक्रीचे उद्दिष्ट ठेवा.
  • कस्टम्स हाऊस एजंट: कार्गो क्लिअरन्समध्ये मदत व्हावी, यासाठी निर्यातदार परवानाधारक कस्टम हाउस एजंटचा वापर करू शकतात.
  • एक्सपोर्ट इन्स्पेक्शन एजन्सी: या संस्था उत्पादकांना दर्जेदार व्यवस्थापन प्रणाली राखण्यात, उत्पादनाचे सातत्य, शिपमेंट-पूर्व तपासणी आणि प्रमाणनाची खातरजमा करण्यात मदत करतात.