गुंतवणूकदारांकडून वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न १. मैत्री MAITRI म्हणजे काय?
राज्यात गुंतवणूक आणि रोजगार आकर्षित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा कक्ष – MAITRI सुरू केला आहे. हा कक्ष शासनाकडून उद्योगांना दिल्या जाणाऱ्या अर्थात G2B सेवा प्रदान करतो. विद्यमान आणि संभाव्य गुंतवणूकदारांना त्यांच्या विद्यमान एककांचा विस्तार करण्यासाठी किंवा राज्यात नवीन व्यवसाय एकक स्थापन करण्याच्या संदर्भात गुंतवणूक प्रक्रियेबद्दल एकत्रित माहिती मिळवण्यासाठी मैत्री हे एकमेव ठिकाण आहे. हा कक्ष नियामक नाही तर सुविधा प्रदात्याच्या भूमिकेतून उद्योग सुलभतेच्या कामी मोलाची भूमिका बजावतो.
प्रश्न २. मैत्री MAITRI कक्ष काय करतो?
हा कक्ष गुंतवणूकदारांना आवश्यक मंजूरी आणि सेवा वेळेवर प्राप्त होतील, याची खातरजमा करतो, त्याचबरोबर गुंतवणूकदारांना आवश्यक सहाय्य प्रदान करतो. मैत्री पोर्टलमार्फत एकल खिडकी यंत्रणाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कक्षाद्वारे गुंतवणुकीशी संबंधित तक्रारी हाताळल्या जातात, तसेच माहितीचे सर्वसमावेशक भांडार म्हणूनही हा कक्ष कार्यरत आहे. उद्योग सुलभतेसाठी विभाग आणि संस्थांशी समन्वय साधतानाच गुंतवणुकीशी संबंधित सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी हा कक्ष प्रयत्नशील आहे.
प्रश्न ३. महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा कायदा, २०२३ काय आहे?
या कायद्यान्वये महाराष्ट्र राज्यात उद्योग करण्यासाठी आवश्यक परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सुव्यवस्थित करून उद्योग आणि गुंतवणुकीसाठी एकल खिडकी प्रणालीची स्थापना केली आहे.
प्रश्न ४. गुंतवणूक विझार्ड मॉड्यूल काय आहे आणि त्याचा उद्देश काय आहे?
विझार्ड मॉड्युल हे नोडल संस्थेने तयार केलेले ऑनलाइन साधन आहे. या मॉड्यूल द्वारे महाराष्ट्रात उद्योग उभारण्यासाठी किंवा चालवण्यासाठी आवश्यक परवानग्या आणि मंजुरीबाबत माहिती दिली जाते.
प्रश्न ५. मला मैत्री MAITRI कक्षासोबत कसा संपर्क साधता येईल?
मैत्री MAITRI कक्षासोबत संपर्क साधण्यासाठी तुम्ही ‘maitri-mh@gov.in’ येथे ईमेल पाठवू शकता. मैत्री समर्पित हेल्पलाइन क्रमांक: 1860 233 2028. 24 x 7 नागरिक कॉल सेंटर: 1800 120 8040 (टोल फ्री) 91-22-22622362 / 2262 2322
प्रश्न ६. मैत्री MAITRI द्वारे सादर केलेल्या माझ्या अर्जाचा पाठपुरावा मला करता येईल का?
होय, “अर्ज केलेल्या सेवा” या विभागात अर्जांची सद्यस्थिती पाहता येईल.
प्रश्न ७ . मंजूरीसाठीच्या अर्जांना विलंब झाल्यास विभाग कशा प्रकारची कारवाई करतो?
आरटीएस अंतर्गत अधिसूचित कालमर्यादा ओलांडणाऱ्या प्रलंबित अर्जांवर कायद्याने विहित केलेल्या अधिकारप्राप्त समितीद्वारे उचित कारवाई केली जाते जातात.
प्रश्न ८. मैत्री चा वापर प्रभावीपणे करण्यासाठी विशिष्ट वेब ब्राउझर किंवा तांत्रिक वैशिष्ट्ये आवश्यक आहेत का?
अशा कोणत्याही बाबी निर्दिष्ट केलेल्या नाहीत, मात्र सर्वोत्तम अनुभवासाठी आपल्याकडे स्थिर आणि अद्यतनित इंटरनेट ब्राउझर असेल, याची खातरजमा वापरकर्त्यांनी केली पाहिजे.
प्रश्न ९. बिलिंग त्रुटी, विलंबित अर्ज, स्थानिक पातळीवरील तक्रारी, प्रोत्साहन आणि अनुदानासाठी मला मदत कशी मिळवता येईल?
वर नमूद केलेल्या संपर्क तपशिलांचा वापर करून तुम्ही मैत्री टीमला ईमेल करू शकता किंवा कॉल करू शकता.
प्रश्न १०. सर्व धोरणे, अनुदाने आणि प्रोत्साहने यांची माहिती मला कोठे मिळेल?
मैत्री पोर्टलच्या अधिनियम / धोरणे टॅब अंतर्गत क्षेत्र निहाय धोरणे सूचीबद्ध आहेत. ती येथे पाहता येतील. https://testmaitri3.mahaitgov.in/resources/policies/