माहिती तंत्रज्ञान
राज्याचे परिदृश्य
- महाराष्ट्र राज्य देशात लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या आणि भौगोलिक क्षेत्रानुसार तिसऱ्या क्रमांकावर आहे.
- २०११ सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११२ कोटी होती. राज्याचा साक्षरता दर ८२.३% आणि लिंग गुणोत्तर ९२९ आहे (दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या).
- महाराष्ट्र हे भारतातील सर्वात जास्त शहरीकरण झालेल्या राज्यांपैकी एक आहे, राज्यातील लोकसंख्येची घनता प्रति चौ. किमी ३६५ इतकी आहे.
- भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात १५% योगदान देणारे महाराष्ट्र राज्य ही भारतातील सर्वात मोठी राज्य-अर्थव्यवस्था आहे.
- औद्योगिकदृष्ट्याही सक्षम असणारे महाराष्ट्र राज्य भारताच्या एकूण उत्पादनात १५.५% आणि देशातून होणाऱ्या निर्यातीत १५.७% योगदान देते.
- महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक आणि पायाभूत सुविधांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे::
- दोन मोठी (जेएनपीटी आणि एमबीपीटी) आणि ४८ लहान बंदरे असणारी ७२० किलोमीटर लांबीची किनारपट्टी
- १८,३६६ किमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आणि ३०,४६५ किमी लांबीचा राज्य महामार्ग; राज्यातील ९९.२% गावे रस्त्याने जोडलेली आहेत
- देशाच्या एकूण रेल्वे जाळ्यापैकी ९% अर्थात ११,६३१ किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग राज्यात आहे.
- एकूण ४ आंतरराष्ट्रीय आणि ८ देशांतर्गत विमानतळ कार्यरत, नवी मुंबई आणि पुणे (पुरंदर) येथे आणखी दोन विमानतळ निर्माणाधीन.
- स्थापित वीजनिर्मिती क्षमतेच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
- वार्षिक १.०३ दशलक्ष मेट्रिक टन इतक्या शीत संग्रहण क्षमतेसह वार्षिक २.२३ दशलक्ष मेट्रिक टन इतकी एकूण गोदाम क्षमता
- राज्यात २९२ औद्योगिक क्षेत्रे, ९९ सहकारी औद्योगिक वसाहती आणि २.५ लाख एकर क्षेत्र व्यापणारी समर्पित क्षेत्रीय उद्याने आहेत. त्याचबरोबर राज्यात समर्पित वाइन पार्क, सिल्व्हर पार्क, नऊ विशेष आर्थिक क्षेत्रे, फुलशेती, फूड पार्क, टेक्सटाईल पार्क आणि २७ आयटी पार्क्स आहेत.
क्षेत्राची वैशिष्ट्ये
भारत
- २०२१ वर्षात जागतिक स्तरावरील माहिती तंत्रज्ञान उद्योग पाच ट्रिलियन अमेरिकन डॉलरवर पोहोचेल, असा अंदाज आहे. जागतिक स्तरावरील बहुतेक माहिती तंत्रज्ञान उद्योग प्रामुख्याने अमेरिका आणि सभोवताली केंद्रित आहेत (३२%); त्याखालोखाल युरोपियन युनियन (२०%), आशियाई प्रदेश (१४%), आणि ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड (११%) येथे आहेत.
- कोविड-१९ मुळे अलीकडच्या काही वर्षांमध्ये या उद्योगात वेगाने वाढ झाली आहे. जागतिक माहिती तंत्रज्ञान सेवा बाजारपेठेचा आकार २०२४ मध्ये १.२ ट्रिलियन अमेरिकन डॉलर राहील असा अंदाज आहे आणि २०२९ सालापर्यंत तो १.८ ट्रिलियन अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
- २०१८-१९ या वर्षात भारतातील आयटी आणि आयटीईएस उद्योगाचा महसूल ६.१% वाढीसह १७७ अब्ज अमेरिकन डॉलर इतका होता.
- सध्या भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे योगदान ८% इतके आहे, सेवा निर्यातीत ते निम्म्यापेक्षा जास्त आहे, आणि थेट परकीय गुंतवणुकीत ५०% इतके आहे. २०२०-२१ मध्ये या क्षेत्राने ४.३ दशलक्षापेक्षा जास्त लोकांना रोजगार दिला.
- २०२५ सालापर्यंत भारताला १ ट्रिलियन अमेरिकन डॉलर मूल्याची डिजिटल अर्थव्यवस्था म्हणून विकसित करण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे
- २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारतीय IT-BPM उद्योग (ई-कॉमर्स वगळून) २५४ अब्ज अमेरिकन डॉलर मूल्याचा असेल, असा अंदाज आहे, यात २०२३-२४ या आर्थिक वर्षातील २०० अब्ज अमेरिकन डॉलर मूल्याच्या निर्यातीचा समावेश आहे.
- २०२४ या वर्षात जागतिक बाजारपेठेतील १६% योगदानासह भारतातील माहिती तंत्रज्ञान सेवा बाजारपेठेचा आकार १९५ अब्ज अमेरिकन डॉलर इतका अंदाजित आहे.
- ऑनलाइन गेमिंग क्षेत्र २०२१ मध्ये २८% नी वाढून १.९ अब्ज अमेरिकन डॉलर पर्यंत पोहोचले आहे. २०२५ सालापर्यंत ते तीन पटीने वाढून ३.९ अब्ज अमेरिकन डॉलर पर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे
- २०२४ या वर्षात भारतीय ॲनिमेशन आणि व्हीएफएक्स उद्योगाचा आकार १.७ अब्ज अमेरिकन डॉलर इतका आहे. भारतातील प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन उद्योगाचा एकूण आकार २०३० सालापर्यंत १०० अब्ज अमेरिकन डॉलर पर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे. जागतिक बाजारपेठेतील भारताचा हिस्सा १% पेक्षा कमी आहे
- भारतीय डेटा सेंटर बाजारपेठेचा सध्याचा आकार सहा अब्ज अमेरिकन डॉलर आहे आणि २०२२-२७ या अवधीत तो १५% सीएजीआर ने वाढून १० अब्ज अमेरिकन डॉलर पर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे.
महाराष्ट्र
- तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचे प्रमुख केंद्र. १९९० सालापासून महाराष्ट्र राज्य हे आयटी आणि आयटीईएस, इलेक्ट्रॉनिक्स आणि कॅप्टिव्ह बिझनेस आउटसोर्सिंग उद्योगांचे प्रमुख केंद्र म्हणून उदयाला आले आहे.
- २०२४ या वर्षात महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान बाजारपेठेचा आकार ४८ अब्ज अमेरिकन डॉलर इतका राहिल, (भारतातील एकूण माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या १९%) असा अंदाज आहे.
- देशांतर्गत आणि जागतिक क्षेत्रात स्पर्धात्मकता निर्माण करणे. एकूण निर्यातीपैकी जवळपास २०% योगदानासह महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान निर्यातीच्या बाबतीत देशात सातत्याने दुसऱ्या क्रमांकावर आहे.
- महाराष्ट्र राज्य हे अनेक केबल लँडिंग स्टेशनसह भारतातील सर्वात प्रमुख डेटा सेंटर बाजारपेठ असून देशाच्या डीसी फूटप्रिंटपैकी सुमारे ६०% महाराष्ट्रात आहे.
- मुंबई, पुणे, ठाण्याबरोबरच रायगड, नागपूर, औरंगाबाद, नाशिक आणि कोल्हापूर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये व्यवसाय विस्तारत असलेल्या आयटी कंपन्यांसाठी महाराष्ट्र हे एक प्रमुख गंतव्यस्थान.
- अग्रगण्य मोशन पिक्चर्सचा हब: देशातील सर्वात मोठे मोशन पिक्चर्स निर्माते. राज्यभरातील १०७६ स्क्रीनसह तिसऱ्या क्रमांकावर
- महाराष्ट्रात एकूण २९५ एव्हीजीसी स्टुडिओ असून हे प्रमाण संपूर्ण भारतातील एव्हीजीसी स्टुडिओपैकी ३० टक्के इतके आहे.
- सर्वात जास्त डिजिटल वापरकर्ते: भारतातील एकूण इंटरनेट वापरकर्त्यांपैकी १३.५% अर्थात १२.६ कोटी सेल फोन वापरकर्ते महाराष्ट्रात आहेत.
- भारतातील १७% टेक स्टार्ट अप महाराष्ट्रात आहेत (९,५२४ टेक स्टार्ट अप)
- ॲनिमेशन, व्हीएफएक्स आणि गेमिंग शिकवणारी २० विद्यापीठे मुंबई आणि पुण्यात आहेत.
- ०.८ दशलक्ष लोकांना रोजगार देणारी २०५ खाजगी आयटी पार्क कार्यरत आणि 0.3 दशलक्ष लोकांना रोजगार देणारी ३७ सार्वजनिक आयटी पार्क कार्यरत
दृष्टीकोन, ध्येय, उद्दिष्टे
दृष्टीकोन:
नाविन्यपूर्ण, न्याय्य, सर्वसमावेशक आणि शाश्वत तंत्रज्ञान विकासाकडे वाटचाल करत महाराष्ट्राला जागतिक आयटी आणि आयटीईएस गंतव्यस्थान तसेच भारताची तंत्रज्ञान राजधानी म्हणून विकसित करणे.
ध्येय:
- धोरणात्मक उपक्रम, स्पर्धात्मकतेचा विकास आणि व्यावसायिकदृष्ट्या पुरक वातावरण तयार करून जागतिक स्तरावर आयटी आणि आयटीईएस उपक्रमांमध्ये गुंतवणुकीसाठी आणि नवोन्मेषासाठी महाराष्ट्र हे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण म्हणून विकसित करणे.
- भारतातील आयटी आणि आयटीईएस क्षेत्रातील आघाडीची स्थिती मजबूत करणे.
- शाश्वत आणि समतोल प्रादेशिक विकासासाठी राज्यात आयटी आणि आयटीईएस क्षेत्रात गुंतवणुकीच्या ओघाला प्रोत्साहन देणे.
- नवीन तंत्रज्ञान उत्पादने/सेवांसाठी विशेषत: महाराष्ट्रात विकसित केलेल्या स्वदेशी उत्पादनांसाठी बौद्धिक संपदा निर्मिती, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान व्यापारीकरणाला प्रोत्साहन देणे.
- संबंधित सहायक परिसंस्था विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करून उदयोन्मुख तंत्रज्ञानातील गुंतवणुकीच्या ओघात लक्षणीय वाढ करून जागतिक कंपन्यांसाठी भारताला पसंतीचे गंतव्यस्थान म्हणून विकसित करणे.
- अत्यंत रोजगारक्षम, कुशल आणि महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या वाढीला चालना देणारे, आयटी आणि आयटीईएस तसेच नव तंत्रज्ञानात कुशल असे मनुष्यबळ सज्ज करणे.
उद्दिष्टे :
- राज्यातील आयटी आणि आयटीईएस क्षेत्रात ९५,००० कोटी रूपयांची नवीन गुंतवणूक आकर्षित करणे
- राज्यात आयटी आणि आयटीईएस क्षेत्राद्वारे नोकरीच्या ३.५ दशलक्ष नवीन संधी निर्माण करणे. अत्यंत रोजगारक्षम, हुशार आणि दर्जेदार मनुष्यबळ विकसित करण्यासाठी कौशल्य विकासात दरवर्षी १५% दराने वाढ करणे.
- राज्यातील आयटी आणि आयटीईएस क्षेत्राद्वारे १०,००,००० कोटी रुपयांची निर्यात साध्य करणे.
धोरणात्मक उपक्रम आणि प्रोत्साहने
आयटी आणि आयटीईएस घटकांचे विकेंद्रीकरण: नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजी नगर अशा ठिकाणी माहिती तंत्रज्ञानाची नवीन केंद्रे विकसित करण्यासाठी अशा टायर २ आणि टायर ३ शहरांमध्ये आयटी आणि आयटीईएस उपक्रमांच्या विस्ताराला धोरणात्मक पाठिंबा.
उदयोन्मुख तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित: एआय, आयओटी, ब्लॉकचेन आणि रोबोटिक्स अशा उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा विकास आणि अवलंब करण्यावर राज्याचे धोरण भर देते. यामध्ये नवोन्मेष आणि कामगारांच्या उन्नतीसाठी सहाय्याचा समावेश आहे.
एकात्मिक माहिती तंत्रज्ञान वसाहती: हे धोरण आयटी आणि आयटीईएस उपक्रमांना समर्थन देण्यासाठी किमान क्षेत्राचा वापर आणि मिश्रित-वापर जमीन वाटपासह एकात्मिक माहिती तंत्रज्ञान वसाहती विकसित करायला प्रोत्साहन देते. वॉक टू वर्क संस्कृतीलाही हे धोरण प्रोत्साहन देते.
निरंतर उद्योग दर्जा: माहिती तंत्रज्ञान सेवांना निरंतर उद्योगाचा दर्जा दिला आहे, त्यामुळे कामकाज दिवसभर, २४ तास चालते, परिणामी स्थिर कामकाजाचे वातावरण निर्माण होते.
स्टार्ट-अप्स आणि नवोन्मेषाला समर्थन: महामंडळे, सरकार, गुंतवणूकदार, मार्गदर्शक आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील सहकार्यासाठी एकात्मिक परिसंस्था प्रदान करण्याच्या उद्देशाने या धोरणांतर्गत महाराष्ट्र हब (M-Hub) सारख्या हबद्वारे स्टार्ट-अप आणि नवोन्मेषावर आधारित उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.
एकात्मिक एकल खिडकी यंत्रणा: ही यंत्रणा आयटी आणि आयटीईएस प्रकल्पांसाठी मंजूरी आणि निष्कासन सुव्यवस्थित करते, ज्यामुळे महाराष्ट्रात उद्योग सुरू करणे आणि त्याचे परिचालन करणे सोपे होते. मैत्री आणि माहिती पोर्टल राज्यातील उद्योग सुलभ करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचे सार्थ प्रतिक आहेत.
आयटी पार्क्समध्ये रस्ते जोडणी, उर्जासंबंधी पायाभूत सुविधा आणि सांडपाणी वहन यंत्रणा विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार ‘क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर’ निधी स्थापन करेल.
अत्यंत रोजगारक्षम, हुशार आणि दर्जेदार मनुष्यबळ विकसित करण्यासाठी कौशल्य विकासात दरवर्षी १५% दराने वाढ करण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे.
महत्वाची आर्थिक प्रोत्साहने:-
सर्व आयटी/आयटीईएस एककांसाठी सामाईक
- सवलत: ५०%-१००% मुद्रांक शुल्क सवलत, विद्युत शुल्क सूट
- सवलतीचे सहाय्य: औद्योगिक दराने वीजपुरवठा, निवासी दरांच्या समकक्ष मालमत्ता कर
- प्रतिपूर्ती आधारावर एककांना सहाय्य: पॉवर रॅशनलायझेशन बेनिफिट, प्रमाणन सहाय्य, बाजारपेठ विकसन सहाय्य, पेटंट संबंधित सहाय्य, भाडे सहाय्य
डेटा केंद्रे
- सवलत: उर्जा दरात सवलत
उदयोन्मुख तंत्रज्ञान
- सवलत: उर्जा दरात सवलत, भांडवल सवलत
- सहाय्य: भर्ती सहाय्य
एव्हीजीसी
- सवलत: उर्जा दरात सवलत, भांडवल सवलत
- सहाय्य: भर्ती सहाय्य, कौशल्य विकास सहाय्य
- अनुदान: कार्यक्रम आणि स्पर्धांसाठी अनुदान
महत्वाची आर्थिकेतर प्रोत्साहने:-
सर्व आयटी/आयटीईएस एककांसाठी सामाईक
- ओपन ऍक्सेस प्राप्त
- आवश्यक सेवांची सद्यस्थिती
- उद्योग सुलभता: एकल खिडकी सुविधा (मैत्री, माहिती), कोणत्याही झोनमध्ये सेटअप
- एम-हब – नवोन्मेष आणि उद्योजकतेसाठी उत्कृष्टता केंद्र
डेटा केंद्रे
- वर्षभर वीज पुरवठा
- वाहनतळ नियमांचे शिथिलीकरण
- डायल बिफोर Dig सेवा
- पायाभूत सुविधांची सद्यस्थिती
- कॅप्टिव्ह पॉवर फार्म्स स्थापन करण्याची सुविधा
- अभिमत वितरण परवान्यांची तरतूद
उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि एव्हीजीसी
- उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि एव्हीजीसी साठी बौद्धिक संपदा संरक्षण सुविधा
- एव्हीजीसी एककांसाठी जागतिक संयुक्त उपक्रम आणि आंतरराष्ट्रीय जाहिरात.
राज्याने घोषित केलेले निवासी क्षेत्र, ना-विकास क्षेत्र आणि हरीत विकास क्षेत्र यासह सर्व क्षेत्रांमध्ये एकात्मिक माहिती तंत्रज्ञान वसाहत, खाजगी आयटी पार्क तसेच आयटी आणि आयटीईएस एकके स्थापना करण्याची परवानगी.
परिसंस्थेचे सक्षमीकरण (विझार्ड, इन्सेंटिव्ह कॅल्क्युलेटर, एकल खिडकी, मैत्री कक्ष)
महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाला प्रस्थापित करणारी राज्यातील आघाडीची नावे:
