रत्ने आणि आभूषणे

राज्याचे परिदृश्य:

  • महाराष्ट्र राज्य देशात लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या आणि भौगोलिक क्षेत्रानुसार तिसऱ्या क्रमांकावर आहे.
  • २०११ सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११२ कोटी होती. राज्याचा साक्षरता दर ८२.३% आणि लिंग गुणोत्तर ९२९ आहे (दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या).
  • महाराष्ट्र हे भारतातील सर्वात जास्त शहरीकरण झालेल्या राज्यांपैकी एक आहे, राज्यातील लोकसंख्येची घनता प्रति चौ. किमी ३६५ इतकी आहे.
  • भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात १५% योगदान देणारे महाराष्ट्र राज्य ही भारतातील सर्वात मोठी राज्य-अर्थव्यवस्था आहे.
  • औद्योगिकदृष्ट्याही सक्षम असणारे महाराष्ट्र राज्य भारताच्या एकूण उत्पादनात १५.५% आणि देशातून होणाऱ्या निर्यातीत १५.७% योगदान देते.
  • महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक आणि पायाभूत सुविधांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे:
    • दोन मोठी (जेएनपीटी आणि एमबीपीटी) आणि ४८ लहान बंदरे असणारी ७२० किलोमीटर लांबीची किनारपट्टी
    • १८,३६६ किमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आणि ३०,४६५ किमी लांबीचा राज्य महामार्ग; राज्यातील ९९.२% गावे रस्त्याने जोडलेली आहेत
    • देशाच्या एकूण रेल्वे जाळ्यापैकी ९% अर्थात ११,६३१ किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग राज्यात आहे.
    • एकूण ४ आंतरराष्ट्रीय आणि ८ देशांतर्गत विमानतळ कार्यरत, नवी मुंबई आणि पुणे (पुरंदर) येथे आणखी दोन विमानतळ निर्माणाधीन.
    • स्थापित वीजनिर्मिती क्षमतेच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
    • वार्षिक १.०३ दशलक्ष मेट्रिक टन इतक्या शीत संग्रहण क्षमतेसह वार्षिक २.२३ दशलक्ष मेट्रिक टन इतकी एकूण गोदाम क्षमता
    • राज्यात २९२ औद्योगिक क्षेत्रे, ९९ सहकारी औद्योगिक वसाहती आणि २.५ लाख एकर क्षेत्र व्यापणारी समर्पित क्षेत्रीय उद्याने आहेत. त्याचबरोबर राज्यात समर्पित वाइन पार्क, सिल्व्हर पार्क, नऊ विशेष आर्थिक क्षेत्रे, फुलशेती, फूड पार्क, टेक्सटाईल पार्क आणि २७ आयटी पार्क्स आहेत.

क्षेत्र वैशिष्ट्ये: रत्ने आणि आभूषणे

भारत:

  • भारतातील रत्ने आणि आभूषण उद्योग भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात ७ % योगदान देतो.
  • भारतातून निर्यात होणाऱ्या एकूण व्यापारी मालामध्ये या क्षेत्राचे योगदान सुमारे १५.७१% इतका असून एकूण योगदानाच्या बाबतीत ते तिसऱ्या क्रमांकावरील क्षेत्र आहे.
  • २०२२-२३ या वर्षात देशातील एकूण निर्यातीमध्ये रत्ने आणि आभूषणे क्षेत्राचे योगदान सुमारे ७४.६६% असून देशाचे पश्चिम क्षेत्र हे या निर्यातीचे प्रमुख केंद्र आहे.
  • २०२२ सालच्या आकडेवारीनुसार भारताच्या रत्ने आणि आभूषणे क्षेत्रातील निर्यातीचा वाटा जगातील एकूण निर्यातीपैकी ४.३% इतका आहे, ज्यामुळे भारत हा जगातील सहाव्या क्रमांकाचा निर्यातदार देश बनला आहे.

महाराष्ट्र:

  • रत्ने आणि आभूषणे उद्योग महाराष्ट्राच्या सकल राज्यांतर्गत उत्पादनात ७.५% योगदान देतो, यावरून राज्याच्या आर्थिक वाढीमध्ये या क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित होते.
  • २०२३-२४ या आर्थिक वर्षात देशाच्या रत्ने आणि आभूषणे निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा तब्बल ४७% आहे, आणि त्याचे मूल्य १५ अब्ज अमेरिकन डॉलर इतके आहे.
  • अमेरिका, हाँगकाँग, संयुक्त अरब अमिराती, बेल्जियम, इस्रायल इ. देशांना महाराष्ट्र रत्ने आणि आभूषणे निर्यात करतो
  • या क्षेत्राने साडेतील लाखपेक्षा जास्त रोजगार निर्माण केले आहेत.

भौगोलिक परिदृश्य:

Geography

महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात रत्ने आणि आभूषणे उद्योग

  • एमएसएमईंचे योगदान: महाराष्ट्रातील सात हजार पेक्षा जास्त सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग अर्थात एमएसएमई एकके रत्ने आणि आभूषणे उद्योगात योगदान देतात, त्याचबरोबर आर्थिक वाढ आणि रोजगार वाढीलाही चालना देतात.
  • मेगा सीएफसी प्रकल्प: मेगा सीएफसी हा सीप्झ प्राधिकरण, आणि रत्ने आणि आभूषणे निर्यात प्रोत्साहन परिषद – GJEPC यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे. हा उपक्रम या क्षेत्रातील कौशल्य विकास, उद्योग सुविधा आणि उद्योग वाढीसाठीचे केंद्र म्हणून काम करेल.
  • औद्योगिक समूह: महाराष्ट्र राज्य औद्योगिक-समूह विकास कार्यक्रमांतर्गत नांदेड येथे सुवर्ण आभूषणे समूह स्थापन करण्यासाठी मान्यता प्राप्त झाली आहे.

लॉजिस्टिक्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर: भारताच्या रत्ने आणि आभूषणे उद्योगाला नवे बळ

  • राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२ हे राज्यातील प्रमुख महामार्ग कच्च्या मालाची आणि तयार उत्पादनांची अखंड वाहतूक सुलभ करतात.
  • आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि एअर कार्गो सुविधांमुळे जागतिक स्तरावरील व्यापार सुलभ होतो.
  • गुणवत्ता मानके आणि आंतरराष्ट्रीय मान्यता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने प्रमाणन प्रयोगशाळा मोलाची भूमिका बजावतात.

भारतातील रत्ने आणि आभूषणे उद्योगाची बाजारपेठ

  • सर्वात मोठा हिरे बाजार: : २० एकर क्षेत्र व्यापणारा मुंबईतला भारत डायमंड बाजार हा जगातील सर्वात मोठा हिरे बाजार आहे.
  • पारंपारिक आभूषणांचे केंद्र: भारतातील पारंपारिक आभूषणांच्या समृद्ध वारशाचे प्रतिक असणाऱ्या आणि मुंबईतील २४७ एकर क्षेत्र व्यापणाऱ्या झवेरी बाजारमध्ये दहा हजारपेक्षा जास्त एकके हस्तनिर्मित आभूषणांचे उत्पादनात गुंतलेली आहेत.
  • आधुनिक आभूषणांचे उत्पादन: आधुनिक आभूषणांचे उत्पादन: मुंबईतील सांताक्रूझ येथे १११ एकर क्षेत्रावर उभारलेले सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन (SEEPZ) हे केंद्र आधुनिक ग्राहकांच्या आवडीनिवडी पूर्ण करण्यासाठी मशीन-निर्मित दागिन्यांवर लक्ष केंद्रित करते.
  • जागतिक व्यापार मंच: जागतिक व्यापार मंच: IIJS आणि IIJS सिग्नेचर अशा जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या रत्ने आणि आभूषणे प्रदर्शनांचे मुंबईत आयोजन. दरवर्षी या क्षेत्रातील दहा हजारपेक्षा जास्त उद्योग व्यावसायिकांना आकर्षित करणारी ही आयोजने रत्ने आणि आभूषणे क्षेत्रातील जागतिक व्यापार केंद्र म्हणून मुंबईचे स्थान अधिक मजबूत करतात.

महाराष्ट्राच्या रत्ने आणि आभूषणे उद्योगाला प्रस्थापित करणारी आघाडीची नावे:

Geography