पायाभूत सुविधासंबंधी महत्वाच्या योजना
योजनेचे उद्दिष्ट
राज्याचा औद्योगिक विकास जलदगत्या होण्यास हातभार लावणाऱ्या, औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत
सुविधा निर्माण करणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
ठळक वैशिष्ट्ये
औद्योगिक धोरण २०१३ चा भाग म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाने एक हजार कोटी रूपये इतका ‘महत्वाच्या पायाभूत सुविधा’ निधी स्थापन केला आहे.
सुरूवातीपासून आतापर्यंत २६ औद्योगिक आस्थापनांच्या ६८ प्रस्तावांना अनुदान प्राप्त झाले असून ४१३ कोटी रूपयांचा लाभ मिळाला आहे.
महत्वाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासन ७५% भार उचलते तर २५% खर्च भागधारक करतात.
खालील बाबींसाठी सहाय्य दिले जाते
तळागाळापर्यंत जोडणी
एक्सप्रेस फीडर
अंतर्गत पायाभूत सुविधा
सामाईक सुविधा केंद्र
सांडपाणी प्रक्रिया संयंत्र
योजना राबविणाऱ्या संस्था