रसायने आणि औषधे
राज्याचे परिदृश्य
- महाराष्ट्र राज्य देशात लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या आणि भौगोलिक क्षेत्रानुसार तिसऱ्या क्रमांकावर आहे.
- २०११ सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११२ कोटी होती. राज्याचा साक्षरता दर ८२.३% आणि लिंग गुणोत्तर ९२९ आहे (दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या).
- महाराष्ट्र हे भारतातील सर्वात जास्त शहरीकरण झालेल्या राज्यांपैकी एक आहे, राज्यातील लोकसंख्येची घनता प्रति चौ. किमी ३६५ इतकी आहे.
- भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात १५% योगदान देणारे महाराष्ट्र राज्य ही भारतातील सर्वात मोठी राज्य-अर्थव्यवस्था आहे.
- औद्योगिकदृष्ट्याही सक्षम असणारे महाराष्ट्र राज्य भारताच्या एकूण उत्पादनात १५.५% आणि देशातून होणाऱ्या निर्यातीत १५.७% योगदान देते.
- महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक आणि पायाभूत सुविधांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे:
- दोन मोठी (जेएनपीटी आणि एमबीपीटी) आणि ४८ लहान बंदरे असणारी ७२० किलोमीटर लांबीची किनारपट्टी
- १८,३६६ किमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आणि ३०,४६५ किमी लांबीचा राज्य महामार्ग; राज्यातील ९९.२% गावे रस्त्याने जोडलेली आहेत
- देशाच्या एकूण रेल्वे जाळ्यापैकी ९% अर्थात ११,६३१ किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग राज्यात आहे.
- एकूण ४ आंतरराष्ट्रीय आणि ८ देशांतर्गत विमानतळ कार्यरत, नवी मुंबई आणि पुणे (पुरंदर) येथे आणखी दोन विमानतळ निर्माणाधीन.
- स्थापित वीजनिर्मिती क्षमतेच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
- वार्षिक १.०३ दशलक्ष मेट्रिक टन इतक्या शीत संग्रहण क्षमतेसह वार्षिक २.२३ दशलक्ष मेट्रिक टन इतकी एकूण गोदाम क्षमता
- राज्यात २९२ औद्योगिक क्षेत्रे, ९९ सहकारी औद्योगिक वसाहती आणि २.५ लाख एकर क्षेत्र व्यापणारी समर्पित क्षेत्रीय उद्याने आहेत. त्याचबरोबर राज्यात समर्पित वाइन पार्क, सिल्व्हर पार्क, नऊ विशेष आर्थिक क्षेत्रे, फुलशेती, फूड पार्क, टेक्सटाईल पार्क आणि २७ आयटी पार्क्स आहेत.
क्षेत्र: रसायने
भारत
- २०२३-२४ या वर्षातील भारतातील प्रमुख रसायनांचे उत्पादन ९५३४ हजार मेट्रिक टन आहे.
- २०२३-२४ या वर्षातील एकूण निर्यातीमध्ये रसायने आणि रासायनिक उत्पादनांच्या (औषध उत्पादने आणि खते वगळून) निर्यातीचा वाटा १०% इतका होता.
- भारतातील रासायनिक आणि पेट्रोकेमिकल (CPC) उद्योगाचे मूल्य १४,९५२ अब्ज रूपये इतके आहे आणि २०२५ सालापर्यंत ते २५,००० अब्ज रूपयांपर्यंत वाढेल, असा अंदाज आहे.
- भारत हा जागतिक स्तरावर सहाव्या क्रमांकाचा आणि आशिया खंडातील चौथ्या क्रमांकाचा रसायन- उत्पादक देश आहे.
- भारतीय रसायने उद्योग आंतरराष्ट्रीय रसायने बाजारपेठेत २.६% योगदान देतो. २०२५ सालापर्यंत हे प्रमाण ९.३% अर्थात २५,५३६ अब्ज रुपयांपर्यंत वाढेल, अशी अपेक्षा आहे.
- रसायने निर्यातीत (औषधे वगळून) भारत जागतिक स्तरावर अकराव्या क्रमांकावर आहे.
- जगातील एकूण रसायने विक्रीत भारतातील रसायन उद्योगाचे योगदान २.५% इतके आहे.
- भारताच्या एकूण निर्यातीमध्ये रसायने उत्पादनांचे योगदान ११.३ % इतके आहे.
- भारत हा जगभरातील कृषी रसायनांचा चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे.
- २०१९-२० या वर्षात भारताच्या सकल मूल्यवर्धनामध्ये रसायने आणि औषधे उद्योगाचे योगदान १.२१ % इतके होते.
- हा उद्योग दोन दशलक्ष लोकांना रोजगार देतो.
महाराष्ट्र
- महाराष्ट्र हे भारतातील रासायनिक क्षेत्रातील एक अग्रगण्य राज्य आहे, जे सकल मूल्यवर्धनामध्ये १९% योगदान देते, ज्यामुळे ते या बाबतीत भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे अव्वल राज्य आहे.
- महाराष्ट्राच्या औद्योगिक उत्पादनात रासायनिक क्षेत्राचे योगदान १३.५% आहे.
- राज्यात रासायनिक उद्योगात तीन लाखपेक्षा जास्त लोकांना रोजगार आहे.
- भारताच्या एकूण रासायनिक निर्यातीत महाराष्ट्राचे योगदान १७% इतके आहे.
- महाराष्ट्रात ३६०० रासायनिक कारखाने आहेत.
- राज्यातील कीटकनाशके, रंग आणि संबंधित उद्योगांमधून (एनआयसी २०२) ८४० अब्ज रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे.
- महाराष्ट्रातील मूलभूत रसायने आणि खते उद्योगातून (एनआयसी २०१) १००८ अब्ज रूपये इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्राच्या रसायने उद्योगाला प्रस्थापित करणारी राज्यातील आघाडीची नावे:

औषधे
भारत
- उत्पादनाचे प्रमाण विचारात घेता जागतिक स्तरावर भारत हा तिसऱ्या क्रमांकाता सर्वात मोठा औषध उत्पादक देश आहे.
- जेनेरिक औषधांच्या जागतिक बाजारपेठेत भारताचे योगदान २०% आहे, ६० उपचारात्मक श्रेणींमध्ये ६०,००० ब्रँड्स उत्पादन घेतात.
- अमेरिकेच्या बाहेर असणाऱ्या युएसएफडीए-अनुपालक औषध संयंत्रांची संख्या भारतात सर्वात जास्त आहे.
- भारतात ५०० एपीआय (सक्रिय फार्मास्युटिकल घटक) उत्पादक आहेत, जे जागतिक एपीआय बाजारपेठेत ८% योगदान देतात.
- २०२३-२४ या वर्षात औषध क्षेत्राची एकूण वार्षिक उलाढाल ४,१७,३४५ कोटी रूपये इतकी होती. २०२२-२३ च्या तुलनेत या उलाढालीत १०% वाढ झाली आहे.
- एप्रिल २००० ते मार्च २०२४ या अवधीत औषधे आणि वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रात १,५७,०८७ कोटी रूपये इतकी एकूण थेट परकीय गुंतवणूक झाली आहे.
- भारताच्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीच्या ओघात फार्मास्युटिकल आणि मेडीटेक क्षेत्रांचे योगदान ३.८% इतके आहे.
महाराष्ट्र
- ३४७ मोठी औषध एकके आणि ६९३ सूत्रीकरण एकके असणारे महाराष्ट्र राज्य हे एक महत्त्वपूर्ण उत्पादन केंद्र आहे.
- महाराष्ट्रातील मुख्य औषध केंद्रांमध्ये पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि मुंबई या ठिकाणांचा समावेश होतो, ही ठिकाणे “औषध चतुष्कोण” तयार करतात.
- भारताच्या देशांतर्गत औषध उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा १४% इतका आहे.
- भारतीय औषध बाजारपेठेत (IPM) महाराष्ट्राचे योगदान ११% आहे आणि सातत्याने उद्योग-सरासरी विक्रीपेक्षा जास्त वाढ नोंदवली जात आहे.
- भारतात सर्वात जास्त, ४० औषध समूह महाराष्ट्र राज्यात आहेत.
- भारतातील एकूण ७,६७३ औषध एककांपैकी ३८०० एकके एकट्या महाराष्ट्र राज्यात आहेत.
- महाराष्ट्रातील औषध एककांमध्ये १३७४ सूक्ष्म, १०९२ लघु, ९६८ मध्यम आणि ४०७ मोठ्या एककांचा समावेश आहे.
- महाराष्ट्रात ९३५ फार्मसी महाविद्यालये आहेत, जी या क्षेत्राला मजबूत शैक्षणिक पाया प्रदान करतात.
प्रमुख औषधी हब

महाराष्ट्राच्या औषधे उद्योगाला प्रस्थापित करणारी राज्यातील आघाडीची नावे:
