अस्वीकरण आणि धोरणे

अस्वीकरण

या संकेतस्थळावर असलेले सर्व तपशील केवळ माहिती आणि प्रचारार्थ आहेत. संभाव्य गुंतवणूकदाराच्या गुंतवणुकीशी संबंधित कोणत्याही निर्णयाचा आधार तयार करण्याचा, या तपशिलांचा हेतू नाही. स्वारस्य असलेल्या गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी स्वतःची योग्य प्रकारे खातरजमा करून घेतली पाहिजे.

या संकेतस्थळावरील माहिती किंवा या संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रदान करण्यात आलेली किंवा यानंतर प्रदान करण्यात येणारे कोणतेही दस्तावेज किंवा माहिती अचूक किंवा परिपूर्ण असल्याची कोणतीही स्पष्ट किंवा निहित हमी आम्ही देत नाही तसेच या संकेतस्थळाच्या वापरामुळे वापरकर्त्याला कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा हानी सोसावी लागल्यास त्याची कोणतीही जबाबदारी किंवा दायित्व स्वीकारले जाणार नाही.

गोपनीयता धोरण

उद्योग विभागाचे हे संकेतस्थळ तुमची व्यक्तिगत ओळख स्पष्ट करणारी कोणत्याही प्रकारची माहिती (जसे नाव, दूरध्वनी क्र. अथवा ई-मेल) स्वयंचलितरित्या आपल्याकडे ठेवत नाही. तुम्ही आमच्या वेबसाइटला भेट देता तेव्हा तुमचे नाव किंवा पत्ता अशी वैयक्तिक माहिती आम्हाला प्रदान करण्याची निवड केल्यास, तुम्ही दिलेले तपशील आम्ही केवळ तुमच्या माहितीची विनंती पूर्ण करण्यासाठी वापरतो. तुम्ही आमच्या वेबसाइटला भेट देता तेव्हा तुमचे नाव किंवा पत्ता अशी वैयक्तिक माहिती आम्हाला प्रदान करण्याची निवड केल्यास, तुम्ही दिलेले तपशील आम्ही केवळ तुमच्या माहितीची विनंती पूर्ण करण्यासाठी वापरतो. मैत्री मंचाच्या सेवा वापरण्यासाठी, या संकेतस्थळावर वापरकर्ता नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी संकलित केलेली माहिती परस्परसंवाद सुलभ करण्यासाठी वापरली जाते. या संकेतस्थळावर स्वेच्छेने दिलेली कोणतीही वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती आम्ही कोणत्याही तृतीय पक्षाला (सार्वजनिक/खाजगी) विकत नाही किंवा ती कोणाशीही सामायिक करत नाही. या संकेतस्थळावर प्रदान केलेली कोणतीही माहिती नुकसान, गैरवापर, अनधिकृत वापर किंवा प्रकटीकरण, बदल किंवा विनाश यापासून संरक्षित केली जाईल. आम्ही वापरकर्त्याचा इंटरनेट प्रोटोकॉल आयपी अड्रेस, डोमेन नेम, ब्राउजर प्रकार, ऑपरेटिंग सिस्टम, भेटीची तारीख आणि वेळ तसेच पाहिलेली पृष्ठे याचे तपशील संकलित करतो. मात्र आमच्या संकेतस्थळाचे नुकसान करण्याचा प्रयत्न आढळत नाही तोवर आम्ही आमच्या संकेतस्थळाला भेट देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवणाऱ्या अशा तपशिलांमार्फत दुवा साधण्याचा कोणताही प्रयत्न करत नाही.

हायपरलिंकिंग धोरण

या संकेतस्थळावर अनेक ठिकाणी तुम्हाला इतर संकेतस्थळे/ पोर्टल्स/ पृष्ठे यांचे दुवे दिसतील. हे दुवे तुमच्या सुविधेसाठी उपलब्ध करून दिले आहेत. अशा बाह्य दुव्यांवर उपलब्ध माहितीची जबाबदारी उद्योग विभागाची नाही, तसेच तिथे व्यक्त केलेल्या दृष्टिकोनाचे आम्ही समर्थन करत असू, असे नाही. अशा संकेतस्थळांवर उपलब्ध दुवे आणि त्यांच्या यादीला आमचे समर्थन गृहीत धरू नका. हे दुवे प्रत्येक वेळी सक्रिय असतील याची हमी आम्ही देऊ शकत नाही आणि त्या दुव्यांची उपलब्धता, ही आमच्या अखत्यारीतील बाब नाही.

इतर संकेतस्थळांवर मैत्री संकेतस्थळाचा दुवा

या संकेतस्थळावर प्रदान केलेल्या माहितीचा थेट दुवा देण्यावर आमचा आक्षेप नाही आणि त्यासाठी कोणत्याही पूर्व परवानगीची आवश्यकता नाही. मात्र तुम्ही तुमच्या संकेतस्थळावर आमच्या संकेतस्थळाचे दुवे प्रदान केले असतील, तर त्याबाबत आम्हाला सूचित करावे, जेणेकरुन आम्ही संबंधित दुव्यांवर उपलब्ध मजकुरात कोणतेही बदल किंवा अद्यतन केले असल्यास त्याबाबत तुम्हाला कळवले जाईल. तसेच तुमच्या संकेतस्थळाच्या चौकटीमध्ये आमचे पृष्ठ दाखवण्याची परवानगी आम्ही देत नाही. आमच्या संकेतस्थळावरील पृष्ठे, वापरकर्त्याच्या नवीन ब्राउजर विंडोमध्ये उघडायला हवीत.

कॉपीराइट धोरण

आम्हाला ई-मेल पाठवून योग्य परवानगी घेतल्यानंतर या संकेतस्थळावर प्रदान केलेल्या माहितीचा विनामूल्य पुनर्वापर करता येईल, मात्र या माहितीचा पुनर्वापर अचूकपणे केला पाहिजे आणि ही माहिती अपमानकारक पद्धतीने अथवा दिशाभूल करण्याच्या संदर्भात वापरता येणार नाही. या संकेतस्थळावरील माहिती प्रकाशित करताना किंवा इतरांशी सामायिक करताना प्रत्येक वेळी मूळ स्रोतास श्रेय दिले जावे. मात्र, या संकेतस्थळावर असणाऱ्या, परंतु तृतीय पक्षाकडे कॉपीराईट असणाऱ्या माहितीच्या संदर्भात, अशा माहितीचा पुनर्वापर करण्याची परवानगी लागू असणार नाही. अशा प्रकारच्या माहितीचा पुनर्वापर करण्याची अधिकृत परवानगी, संबंधित विभाग/कॉपीराईट धारण करणाऱ्यांकडून घेतली गेली पाहिजे. भारतीय कायद्यानुसार या अटी आणि शर्तींचे नियमन केले जाईल. या अटी आणि नियमासंदर्भातील कोणत्याही प्रकारचा वाद भारताच्या न्यायालयीन अधिकार क्षेत्राधीन राहील.

वापराच्या अटी

महाराष्ट्र राज्य शासनाच्या मैत्री कक्षाने या संकेतस्थळाची रचना आणि विकसन केले असून देखभालही करत आहे. या संकेतस्थळावरील मजकुराच्या सत्यतेबाबत सर्वतोपरी खबरदारी घेतली गेली असली, तरी हा मजकूर कोणत्याही कायदेशीर कारणासाठी पुरावा म्हणून वापरता येणार नाही. याबाबत कोणत्याही प्रकारची शंका असल्यास वापरकर्त्याने संबंधीत विभाग अथवा स्रोताकडून खातरजमा करून घ्यावी आणि व्यावसायिक सल्ला घ्यावा.

हा विभाग या संकेतस्थळाच्या वापराच्या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या मर्यादेशिवाय, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या झालेली हानी किंवा नुकसान, किंवा माहितीच्या वापरामुळे उद्भवलेल्या कोणत्याही खर्च, तोटा किंवा नुकसानासाठी जबाबदार राहणार नाही.

भारतीय कायद्यानुसार या अटी आणि शर्तींचे नियमन केले जाईल. या अटी आणि नियमासंदर्भातील कोणत्याही प्रकारचा वाद भारताच्या न्यायालयीन अधिकार क्षेत्राधीन राहील.

या संकेतस्थळावर प्रदान केलेल्या माहितीमध्ये बिगर शासकीय/खाजगी संस्थांनी तयार केलेल्या किंवा त्यांच्यामार्फत देखरेख केल्या जाणाऱ्या हायपरटेक्स्ट लिंक्स किंवा पॉइंटर्सचा समावेश असू शकेल. मैत्रीने हे दुवे तुमच्या माहितीसाठी आणि सुविधेसाठी उपलब्ध करून दिले आहेत. जेव्हा तुम्ही बाह्य दुव्यांची निवड करता, तेव्हा तुम्ही मैत्रीच्या या संकेतस्थळावरून बाहेर पडता. तुमची गोपनीयता आणि सुरक्षा धोरण ‘त्या' बाह्य दुव्याच्या मालकाकडे / प्रायोजकाकडे जाते.

या संकेतस्थळावर प्रदान केलेले दुवे कायम उपलब्ध असतील याची हमी मैत्री देत नाही. दुवा दिलेल्या संकेतस्थळावरील कॉपीराइट केलेल्या सामग्रीचा वापर अधिकृत करणे ही मैत्रीच्या अखत्यारीतील बाब नाही. आवश्यकता भासल्यास वापरकर्त्यांनी अशा दुवा दिलेल्या संकेतस्थळांचे स्वामित्व हक्क बाळगणाऱ्यांकडून खातरजमा करावी, असा सल्ला आम्ही देतो. दुवा दिलेली संकेतस्थळे भारत सरकारच्या वेबसंबंधी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत असल्याची हमी मैत्री देत नाही.

मजकूर पुनरावलोकन धोरण

मैत्री हे शासकीय माहिती प्रसारित करणारे, तसेच शासनातर्फे उद्योगांना दिल्या जाणाऱ्या सेवा प्रदान करणारे एक माध्यम आहे. या संकेतस्थळावरील मजकूर ताजा आणि अद्ययावत ठेवण्यासाठी हे मजकूर पुनरावलोकन धोरण तयार करण्यात आले आहे. या संकेतस्थळावरील विविध भागातील मजकुराचे स्वरूपही वेगवेगळे असल्यामुळे विविध प्रकारच्या मजकुरासाठी पुनरावलोकनाच्या वेगवेगळ्या कालमर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत. पुनरावलोकनाच्या कालमर्यादा निश्चित करताना मजकुराचा प्रकार, वैधता आणि प्रासंगिकता तसेच संग्रहण धोरण या बाबी लक्षात घेण्यात आल्या आहेत.

मजकुराला मंजूरी

मैत्री’चे संकेतस्थळ एकाच विभागाचे प्रतिनिधित्व करते, मात्र यावर एकापेक्षा जास्त स्रोत योगदान देत असतात. असा सर्व मजकूर अपलोड करण्यापूर्वी मैत्री’द्वारे रीतसर मंजूर केला जातो आणि त्याचे सातत्याने निरीक्षण केले जाते.

मजकूर संग्रहण

संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याच्या तारखेपासून सहाव्या वर्षात प्रवेश केल्यानंतर सदर मजकूर ऑनलाइन संग्रहित केला जाईल. कालबाह्य झालेला मजकूर पुनर्प्राप्त करता यावा, यासाठी असा मजकूर तीन वर्षांच्या कालावधीसाठी ऑनलाइन संग्रहित ठेवला जाईल. मागे घेतलेल्या, बंद केलेल्या किंवा तीन वर्षे जुन्या योजना किंवा इतर कोणतेही आदेश संग्रहित केल्याच्या तीन वर्षांनंतर संग्रहित संचयातून काढून टाकले जातील.