आमच्याविषयी
महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा कक्ष (MAITRI) ही गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारी आणि उद्योग सुलभतेला प्रोत्साहन देणारी महाराष्ट्राची समर्पित संस्था आहे. आर्थिक विकासाला चालना देणे, रोजगार निर्मिती करणे आणि महाराष्ट्राला एक आघाडीचे व्यावसायिक गंतव्यस्थान बनवणे, हे महाराष्ट्र सरकारचा स्तुत्य उपक्रम असणाऱ्या या मैत्री संस्थेचे उद्दिष्ट आहे. सरकारची नियामक अशी भूमिका बदलून सुविधा प्रदाता अशी करत, मैत्री ही संस्था गुंतवणुकदारांना सुव्यवस्थित सेवा प्रदान करते तसेच महाराष्ट्रात उद्योग उभारणे आणि त्यांचा विस्तार करण्यासाठी आवश्यक माहिती वेळेत प्रदान करते.
आमच्या सेवा
गुंतवणूक प्रोत्साहन आणि भागीदारी
मैत्री ही संस्था राज्यात विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देते तसेच महाराष्ट्रातील धोरणात्मक संधींची सांगड देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उद्योगांशी सांगड घालते.
एकल खिडकी मंजुरी
आमचे डिजिटल पोर्टल सरकारी सेवा आणि नियामक माहिती सुलभरित्या गुंतवणुकदारांपर्यंत पोहोचविते तसेच गुंतवणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आवश्यक परवानग्या सहजरित्या उपलब्ध करून देते.
माहितीचे मध्यवर्ती केंद्र
मैत्री मंच हा उद्योग संबंधी माहिती, धोरणे, प्रोत्साहने आणि नियामक मार्गदर्शक तत्त्वे यांचा एक व्यापक स्रोत आहे, जो गुंतवणूकदारांना माहितीपूर्ण निर्णय घेण्याच्या कामी सहाय्य करतो.
तक्रार निवारण
गुंतवणुकीशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी मैत्री एक समर्पित यंत्रणा प्रदान करते आणि अडचणी तातडीने दूर करण्यासाठी सरकारी विभागांसोबत सक्रियपणे समन्वय साधते.
गुंतवणूकदारांना सर्वतोपरी सहाय्य
मैत्री ही संस्था गुंतवणुकदारांना पुरेपूर सहाय्य प्रदान करते, प्रत्येक टप्प्यासाठी समर्पित सहाय्य उपलब्ध करून देते तसेच प्राथमिक चौकशीपासून प्रकल्पाच्या अंमलबजावणीपर्यंत गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करते.
महाराष्ट्रात गुंतवणूक का करावी?
भारतातील आघाडीचे औद्योगिक केंद्र असणारे महाराष्ट्र राज्य गुंतवणुकदारांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, प्रतिभाशाली कुशल मनुष्यबळ आणि ग्राहक-समृद्ध बाजारपेठ प्रदान करते. गुंतवणूकदार-स्नेही वातावरण आणि उद्योग सुलभतेवर लक्ष केंद्रित करणारे महाराष्ट्र राज्य दीर्घकालीन विकास आणि नवकल्पना राबविण्यासाठी वचनबद्ध आहे.
महाराष्ट्रात जागतिक गुंतवणूक आकृष्ट करण्यासाठी मैत्री या आमच्या उपक्रमात सहभागी व्हा.