महाराष्ट्रातील निर्यात प्रोत्साहन उपक्रम

निर्यात केंद्र म्हणून जिल्ह्यांचा विकास (DEH): राज्य प्रत्येक जिल्ह्याला निर्यात केंद्र (DEH) म्हणून विकसित करण्यासाठी राज्य सक्रियपणे प्रोत्साहन देते. समग्र निर्यात वाढीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी जिल्ह्यांनाच स्थानिक पातळीवर उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून विकसित करण्याचे महाराष्ट्राचे उद्दिष्ट आहे.

वैविध्यपूर्ण संधी: महाराष्ट्र राज्यातील निर्यात क्षेत्राचा विस्तार करणे आणि नवीन बाजारपेठांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ४०० पेक्षा जास्त निर्यातक्षम उत्पादनांसाठी वैविध्यपूर्ण संधी प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्रयत्नशील आहे.

धोरणात्मक भागीदारी: निर्यात प्रोत्साहन परिषद (EPCs) आणि परदेश व्यापार महासंचालनालयाच्या (DGFT) प्रादेशिक स्तरावरील कार्यालयांमध्ये सक्रियपणे सहभागी. निर्यात क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने जागतिक बाजारपेठेत संचार करण्यासाठी स्थानिक निर्यातदारांना सहाय्य.

संस्थांचे सक्षमीकरण: जिल्ह्यातील, विशेषत: ‘एक जिल्हा एक उत्पादन’ (ODOP) उपक्रमांतर्गत त्या-त्या जिल्ह्यातील उत्पादनांची रचना, पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि पणन वाढविण्यासाठी प्रतिष्ठित महाविद्यालये, संशोधन संस्था आणि स्थानिक संस्थांसोबत हातमिळवणी.

निर्यात प्रोत्साहन कार्यक्रम आणि कार्यशाळा: राज्य शासनातर्फे नियमितपणे निर्यात प्रोत्साहन कार्यक्रम आणि कार्यशाळांचे आयोजन केले जाते, राज्य आणि जिल्हा स्तरावर ज्ञानाची देवाणघेवाण आणि कौशल्य विकासाला तसेच निर्यात वाढीसाठी सहयोगी प्रयत्नांना चालना दिली जाते.

निर्यात प्रोत्साहनासाठी “१० कलमी कार्यक्रम”: महाराष्ट्राने निर्यात प्रोत्साहनासाठी व्यापक “१० कलमी कार्यक्रम” लागू केला आहे. हा कार्यक्रम राज्याच्या निर्यातीच्या शाश्वत वाढीला चालना देण्यासाठी उपयुक्त मुख्य उपक्रमांवर लक्ष केंद्रित करणारा आहे.

क्षमता उभारणी: महत्त्वाकांक्षी निर्यातदारांसाठी त्रैमासिक माहिती सत्रे, कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गुणवत्ता मानके, सुरक्षा मानके, मूल्यवर्धन, निर्यात प्रक्रिया आणि तंत्रज्ञानाचा वापर याबाबत माहिती देण्यावर भर दिला जातो.

गुणवत्ता हमी केंद्र: गुणवत्ता चाचणी आणि प्रमाणपत्रासाठी अत्याधुनिक सुविधांची स्थापन. जागतिक बाजारपेठांमध्ये विनासायास प्रवेशाची खातरजमा करण्यासाठी निर्यातदारांना नियामक मानकांची पूर्तता करण्याकामी सहाय्य केले जाते.

बाजारपेठ विस्तारासाठी उपक्रम: महाराष्ट्र राज्य शासनातर्फे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यांमध्ये निर्यातदारांच्या सहभागाची सोय केली जाते. ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि बाजारपेठेतील संपर्क मजबूत करण्यासाठी तिमाही खरेदीदार-विक्रेता बैठकांचे आयोजन केले जाते.

तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर: निर्यातक्षम उत्पादने प्रकाशझोतात आणण्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसोबत हातमिळवणी केली जाते. तांत्रिक आणि वित्तीय संस्थांसह भागीदारीच्या माध्यमातून यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञान अद्ययावत केले जाते.

पत सहाय्य: वित्तीय आणि बँकिंग संस्थांच्या सहकार्याने पतपुरवठा सुलभ करण्यासाठीही राज्य शासन प्रयत्नशील आहे. स्थानिक निर्यातदारांच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी मजबूत आर्थिक सहाय्य प्रणालीची खातरजमा करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत.

उत्कृष्टतेसाठीचे निर्यात पुरस्कार: उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निर्यातदारांचा सन्मान करण्यासाठी, निर्यात क्षेत्रातील त्यांच्या प्रशंसनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र राज्य उत्कृष्टतेसाठीचे निर्यात पुरस्कार प्रदान करते.