मैत्री आढावा
मैत्री: महाराष्ट्रातील गुंतवणूक परिसंस्थेला सक्षम करणारा उपक्रम
मैत्री ही महाराष्ट्राच्या आर्थिक वाढीला चालना देणारी, नवोन्मेषाला प्रोत्साहन देणारी आणि राज्यातील गुंतवणूक प्रक्रिया सुलभ करणारी समर्पित संस्था आहे. महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेली ही संस्था, महाराष्ट्राला गुंतवणुकदारांच्या दृष्टीने पसंतीचे ठिकाण बनवण्याच्या कामी महत्त्वाची भूमिका बजावते.
मैत्रीची प्रमुख वैशिष्ट्ये:
- धोरणात्मक गुंतवणुकीसाठी सुविधा: गुंतवणुकदारांना महाराष्ट्रात त्यांचे व्यवसाय उभारण्यासाठी आणि व्यवसायांचा विस्तारित करण्यासाठी सुस्पष्ट, कार्यक्षम आणि पारदर्शक प्रक्रिया प्रदान करून महाराष्ट्राला गुंतवणुकदारांच्या दृष्टीने पसंतीचे ठिकाण म्हणून विकसित करण्यासाठी मैत्री ही संस्था सक्रियपणे कार्यरत आहे.
- सहकार्य करणारी परिसंस्था: ही संस्था व्यवसायांच्या वाढीला पोषक वातावरण तयार करण्यासाठी सरकारी संस्था, उद्योग संघटना आणि गुंतवणूकदार यांच्यासोबत सहकार्याच्या भावनेसह काम करते.
- सुलभ गुंतवणूक प्रक्रिया: मैत्री ही संस्था गुंतवणूकदारांना आवश्यक माहिती पुरवते, त्यांना नियामक आवश्यकतांबाबत मार्गदर्शन करते आणि प्रकल्पाची अंमलबजावणी निर्धारित वेळेत व्हावी, यासाठी आवश्यक मंजुरी प्रक्रियांना गती देते.
- शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित: दीर्घकालीन मूल्य निर्मितीवर भर देत नवकल्पनांना वाव देणारी मैत्री ही संस्था उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि सेवा अशा महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये राज्य आघाडीवर राहिल याची खातरजमा करते.
- जागतिक बाजारपेठेतील वावर: मैत्री ही संस्था बाजारपेठेतील नवनवे कल समजून घेत, नव्या प्रचलित पद्धतींशी जुळवून घेते आणि व्यवसायांना वाढीच्या नवीन संधी प्रदान करून जागतिक स्तरावर महाराष्ट्राला आघाडीवर ठेवते.
महाराष्ट्र राज्य उद्योगांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, कुशल कामगार प्रदान करते आणि त्याचबरोबर ग्राहकांच्या मोठ्या बाजारपेठेतील प्रवेशही सुलभ करते. परिणामी महाराष्ट्र हे व्यवसायांचा विस्तार करण्यासाठी आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सतत पुढाकार घेणारे एक आदर्श राज्य ठरले आहे.