योजना
जिल्हा उद्योग केंद्र
परिचय
औद्योगिक धोरण-१९७७ च्या अनुषंगाने, भारत सरकारने जिल्हा उद्योग केंद्रे स्थापन करण्याचा एक कार्यक्रम सुरू केला होता, जो १ मे १९७८ पासून कार्यान्वित होणार होता. या कार्यक्रमांतर्गत टप्प्याटप्प्याने देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा उद्योग केंद्र स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती. जिल्हा मुख्यालयाला लघुउद्योग आणि कुटीर उद्योगांच्या विकासाचा केंद्रबिंदू बनवण्यासाठी, शहरे आणि राज्यांच्या राजधान्यांवर असणारा भर जिल्हा मुख्यालयाकडे वळवण्यासाठी, आणि लहान तसेच ग्रामीण उद्योजकांना आवश्यक असलेल्या सर्व सेवा आणि सहाय्य एकाच ठिकाणी प्रदान करण्याच्या उद्देशाने ही तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार भारत सरकारने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा उद्योग केंद्र स्थापन करण्यासाठी राज्य सरकारला मार्गदर्शक सूचना जारी केल्या. महाराष्ट्र राज्यात ३४ जिल्ह्यांमध्ये अशा जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्रातील ३४ जिल्हा उद्योग केंद्रे कार्यरत आहेत. मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांसाठी सहसंचालक (एमएमआर) कार्यालय योजनांची अंमलबजावणी करते.
उद्योगांना आवश्यक असणारे विविध प्रकारचे सहाय्य आणि मंजुरी एकाच छताखाली उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण उद्योगांना चालना देणे, ही या जिल्हा उद्योग केंद्रांमार्फत राबवायच्या कार्यक्रमाची मुख्य उद्दिष्टे आहेत.
बीज भांडवल योजना
परिचय
उद्योग, सेवा आणि व्यवसायाच्या माध्यमातून स्वयंरोजगार सुरू करण्यास उत्सुक इच्छुकांना संस्थात्मक वित्तपुरवठा प्राप्त केल्यानंतरही उपलब्ध आणि आवश्यक वित्तपुरवठ्यातील तफावत भरून काढून सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून देणे आणि स्वयंरोजगार उपक्रम सुरू करण्यास प्रोत्साहित करणे, हा या योजनेचा उद्देश आहे.
योजनेची व्याप्ती:
१८ मे २००७ रोजीच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य शासनाने पूर्वीच्या बीज भांडवल योजनेत खालील बदल केले आहेत:
- उद्योग, सेवा आणि व्यावसायिक उपक्रम स्वरूपाच्या प्रकल्प खर्चाच दहा लाख रूपयांवरून पंचवीस लाख रूपयांपर्यंत वाढकेली आहे.
- वित्तीय संस्थांनी मंजूर केलेल्या प्रकल्प खर्चाच्या १५ टक्के बीज भांडवल अनुदान सहाय्य दिले जाते. दहा लाख रूपये खर्चापर्यंतच्या प्रकल्पांच्या संदर्भात अजा/अज/इमाव/भज/विजा/दिव्यांगांसाठी वीस टक्के सहाय्याची तरतूद आहे.
- बीज भांडवल घटक कमाल ३.७५ लाख रूपयांपर्यंत
- प्रकल्प खर्चाच्या ७५% बँक कर्ज
- बीज भांडवलावरचा व्याज दर वार्षिक ६% आहे आणि कर्जदाराने नियमितपणे आणि नियोजित वेळेत हप्ता परत केला तर कर्जदाराला व्याजात ३% सवलत मिळेल. त्यामुळे त्याला फक्त ३% व्याज द्यावे लागेल. त्यामुळे नियमित परतफेडीसाठी वार्षिक ३% व्याज.
- हप्ता वेळेत भरला नाही तर त्यावर १% दंडात्मक व्याज लागू होईल
कर्जाची परतफेड तीन वर्षांनी चार वार्षिक हप्त्यांमध्ये सुरू होते. मात्र वाहन प्रकरणांसाठी लोन एलमेंटच्या (loan ailment) संदर्भात सहा महिन्यांनंतर परतफेड सुरू होते.
लघु उद्योगांसाठी जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना
परिचय
एक लाखांपेक्षा कमी लोकसंख्या (१९८१ सालच्या जनगणनेनुसार), तसेच संयंत्र आणि यंत्रसामग्रीमध्ये दोन लाख रूपयांपेक्षा कमी गुंतवणूक असलेल्या, शहरे आणि ग्रामीण भागातील छोट्या घटकांसाठी स्वयंरोजगारासह रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. लघुउद्योग मंडळ तसेच ग्रामोद्योग, हस्तकला, हातमाग, रेशीम आणि काथ्या उद्योगात कार्यरत लहान एककांना या योजनेंतर्गत मार्जिन/सीड मनीच्या (बीज भांडवल) स्वरूपात आर्थिक सहाय्य दिले जाते.
सर्वसाधारण प्रवर्गातील उद्योजकाच्या बाबतीत, मार्जिन मनी सहाय्याची मर्यादा एकूण गुंतवणुकीच्या २०% किंवा ४०,००० रूपये, यापैकी कमी असेल तेवढी आहे. तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील उद्योजकांना एकूण निश्चित भांडवली गुंतवणुकीच्या ३०% पर्यंत किंवा कमाल ६०,००० रूपये, यापैकी जे कमी असेल, तेवढे सहाय्य प्रदान केले जाते.
या कर्जावर 4% दराने व्याज आकारण्याची तरतूद आहे आणि परतफेडीच्या वेळापत्रकात चूक झाल्यास एक% दंडात्मक व्याज आकारण्याची तरतूद आहे. मार्जिन मनी सहाय्याची परतफेड दोन वर्षांच्या प्रारंभिक अवकाशासह ८ वर्षांच्या आत केली जाईल. ही योजना विशेषतः ग्रामीण कारागिरांसाठी उपयुक्त आहे.
उद्योजक विकास प्रशिक्षण कार्यक्रम
परिचय
सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगार उपक्रम किंवा कौशल्यावर आधारित रोजगार प्राप्त करण्यासाठी प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत उद्योजकांना उद्योग/सेवा/व्यावसायिक उपक्रम आणि कौशल्य अद्यतन संबंधित मार्गदर्शन केले जाते. उद्योजकांना उपक्रमांची निवड, जमिनीची गरज, प्रकल्प अहवाल, विविध ना-हरकत प्रमाणपत्रे, परवाने इ. मिळवणे, विपणन धोरण या संदर्भात मार्गदर्शन केले जाते. या योजनेंतर्गत उद्योग संचालनालयाने मान्यता दिलेल्या एमईसीडी, मिटकॉन आणि इतर स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविल्या जाणाऱ्या उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमात उद्योजकाने भाग घेणे आवश्यक आहे.
खालील प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
o एका दिवसाचा उद्योजकता परिचय कार्यक्रम (उद्योजकता परिचय कार्यक्रम) अ-निवासी
या कार्यक्रमात उपक्रमाची निवड, उद्योजकता व्यक्तिमत्व विकास, व्यवसाय व्यवस्थापन, विविध सरकारी संस्था आणि कर्ज स्वरूपात आर्थिक सहाय्य देणाऱ्या संस्थांची माहिती इत्यादींबाबत मार्गदर्शन केले जाते आणि माहिती दिली जाते. प्रत्येक कार्यक्रमाचा एकूण खर्च प्रति प्रशिक्षणार्थी सहाशे रूपये फक्त, इतका मर्यादित आहे.
o उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (१२ दिवस – निवासी)
या कार्यक्रमात बारा दिवसांच्या निवासी प्रशिक्षणाचा (भोजन खर्चासह) समावेश आहे. उद्योजकता परिचय कार्यक्रमात निश्चित केलेल्या आणि निवडलेल्या उमेदवारांना उद्योजकता विकासाबाबत सविस्तर माहिती दिली जाते. प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेला प्रति प्रशिक्षणार्थी चार हजार रूपये इतके अनुदान दिले जाते.
o तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम (१५ दिवस ते २ महिने अ-निवासी)
या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये उत्पादन आणि सेवांशी संबंधित अत्याधुनिक आणि वर्धित तांत्रिक ज्ञानाचा समावेश असतो. प्रशिक्षणार्थींना १५ दिवस पूर्ण झाल्यानंतर पाचशे रूपये, एका महिन्यासाठी एक हजार रूपये आणि दोन महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी दोन हजार रूपये विद्यावेतन दिले जाते. प्रशिक्षण संस्थेला प्रति प्रशिक्षणार्थी तीन हजार रूपये अनुदान दिले जाते.
जिल्हा पुरस्कार योजना
परिचय
लघुउद्योग स्थापन करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्या यशाची आणि कामगिरीची दखल घेण्यासाठी राज्य शासनाने अशा उद्योजकांना जिल्हा स्तरावर जिल्हा पुरस्कार योजना देऊन सन्मानित करण्यास सुरुवात केली आहे. ज्यांनी संबंधित जिल्हा उद्योग केंद्राकडे किमान तीन वर्षे आधी ईएम नोंदणी केली आहे आणि सतत दोन वर्षे उत्पादन सुरू आहे अशा उपक्रमांचे मालक/भागीदार/संचालक या पुरस्कारासाठी पात्र आहेत. जिल्हा स्तरावरील जिल्हा सल्लागार समितीमार्फत उद्योजकाची निवड केली जाते. विकासाचा वेग, स्वदेशीपणा, स्वावलंबन, तंत्रज्ञानाचा वापर, एककाचे स्थान, गुणवत्ता नियंत्रण, निर्यात बाजार, व्यवस्थापन अशा घटक आणि निकषांनुसार या पुरस्कारासाठी उद्योजकांची निवड करण्यात येते. अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती प्रवर्गातील निवडक उद्योजकांना अतिरिक्त गुण दिले जातात. प्रथम पुरस्कार १५,००० रूपये आणि स्मृतिचिन्ह, द्वितीय पुरस्कार १०,००० रूपये आणि स्मृतिचिन्ह.
इतर उपक्रम आणि धोरणांबाबत जाणून घेण्यासाठी कृपया संबंधित पृष्ठे पहा.