कार्यक्रम

दावोस येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय दालनाचे उद्घाटन, जागतिक स्तरावर भारतासाठी अभिमानास्पद क्षण. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली विकसित भारताच्या प्रगतीचे द्योतक असणारा भारतीय ध्वज डौलाने फडकला!


२९ सप्टेंबर २०२४ रोजी गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे येथे उद्योग भरारी २०२४ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यात २००० पेक्षा जास्त जण सहभागी झाले होते.

एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.शिवाजी पाटील यांच्या स्वागतपर भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. औद्योगिक विकासात एमआयडीसीच्या योगदानाबाबत त्यांनी माहिती दिली

सीएमईजीपी, पीएम विश्वकर्मा, मैत्री, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण, आणि मुख्यमंत्री युवा शिक्षण योजना अशा अनेक सरकारी योजनांचे व्हिडिओ प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आले.

मा. उदय सामंत यांच्या हस्ते १० सहभागींना सीएमईजीपी योजनेचे धनादेश वितरित करण्यात आले आणि सहा जणांना पंतप्रधान विश्वकर्मा प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. आपल्या भाषणात मा. उदय सामंत यांनी सरकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेतली, सीएमईजीपी योजनेंतर्गत महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यावर भर दिला आणि महाराष्ट्रात दहा हजार कोटी रूपयांच्या संरक्षण गुंतवणुकीवर चर्चा केली. त्यांनी उद्योग अधिकारी आणि संघटनांना एनएएएम सारख्या फाउंडेशनला पाठिंबा देण्याचे आवाहनही केले.

मा. श्रीरंग आप्पा चंदू भरणे यांनी औद्योगिक विकासासाठी सरकारच्या प्रयत्नांची आणि सीएमईजीपी सारख्या योजनांच्या यशाचे कौतुक केले. मा. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी विविध धोरणांची भूमिका अधोरेखित केली. तर मा. अनिल भंडारी यांनी अर्थव्यवस्थेतील टाटा, महिंद्रा आणि टीसीएस अशा मोठ्या कंपन्यांच्या योगदानावर चर्चा केली. पुणे विभागाचे सहसंचालक श्री. शैलेश राजपूत यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली

दिनांक २८/०९/२०२४
ठिकाण: भूमिपुत्र भवन, नवी मुंबई
एकूण सहभागी – २००० पेक्षा जास्त

आदरणीय विभागीय आयुक्त (उद्योग) श्री. दीपेंद्र सिंह कुशवाह (IAS) यांच्या स्वागतपर भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या उद्योग परिस्थितीवर आणि उद्योग विभागाच्या महत्त्वाच्या कामगिरीवर त्यांनी भर दिला. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री वेलरासू यांनी कोकण विभागातील पायाभूत सुविधांच्या विकासावर प्रकाश टाकला. माननीय उद्योगमंत्री- श्री उदयजी सामंत यांनी कोकण विभागाच्या विकासावर लक्ष केंद्रित करून पायाभूत सुविधांचा विकास, वर्धित नेटवर्क कनेक्टिव्हिटी, लॉजिस्टिक सपोर्ट, निर्यात प्रोत्साहन, गुंतवणूक शिखर परिषद, IGNITE इव्हेंट्स आणि गेल्या दोन वर्षात सीएमईजीपी मध्ये प्राप्त यशाबाबत माहिती दिली आणि त्यासाठी उद्योग संचालनालयाच्या सर्व अधिकाऱ्यांनी घेतलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. जेम्स आणि ज्वेलरी पार्क आणि संरक्षण प्रकल्पांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण औद्योगिक विकास साधल्याबद्दल त्यांनी कोकण विभागातील नवीन गुंतवणुकीची प्रशंसा केली. औद्योगिक क्षेत्रांना पाठिंबा देण्यासाठी सीएमईजीपी, पीएम विश्वकर्मा अशा योजनांच्या आवश्यकतेवरही त्यांनी भर दिला.

दिनांक: २७/०९/२०२४
स्थळ : हॉटेल सेंटर पॉइंट, नागपूर
एकूण सहभागी: १६०० पेक्षा जास्त

या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना माननीय उद्योगमंत्री श्री उदय सामंत यांनी टायर २ आणि टायर ३ शहरांबरोबरच नागपूर विभागातील पायाभूत सुविधांचा विकास साधताना वर्धित नेटवर्क कनेक्टिव्हिटी, लॉजिस्टिक सपोर्ट आणि एमएसएमईच्या वाढीवर लक्ष केंद्रित केल्याची माहिती दिली. विदर्भातील ५०००० कोटी रुपयांच्या पोलाद प्रकल्पांद्वारे लक्षणीय औद्योगिक विकास साधल्याबद्दल त्यांनी नागपूर विभागातील गडचिरोली जिल्ह्याचे कौतुक केले. औद्योगिक क्षेत्राला पाठिंबा देण्यासाठी सीएमईजीपी, पीएम विश्वकर्मा, लाडकी बहिण योजना अशा योजनांच्या आवश्यकतेवरही त्यांनी भर दिला.

दिनांक: २७/०९/२०२४
स्थळ: हॉटेल ग्रँड मेहफिल इन, अमरावती.
एकूण सहभागी: २५०० पेक्षा जास्त

माननीय उद्योगमंत्री श्री उदय सामंत यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना टायर २ आणि टायर ३ शहरांबरोबरच अमरावती विभागातील पायाभूत सुविधांचा विकास साधताना वर्धित नेटवर्क कनेक्टिव्हिटी, लॉजिस्टिक सपोर्ट आणि एमएसएमईच्या वाढीवर लक्ष केंद्रित केल्याची माहिती दिली. भारतातील सात टेक्सटाईल पार्कपैकी एक म्हणून अमरावती जिल्ह्याची निवड झाल्याबद्दल त्यांनी कौतुकही केले. अमरावतीच्या नांदगावपेठ परिसरात असलेल्या या टेक्सटाईल पार्कमध्ये १०००० कोटी रूपयांची गुंतवणूक आणि ३००००० रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. औद्योगिक क्षेत्रांना पाठिंबा देण्यासाठी सीएमईजीपी, पीएम विश्वकर्मा, लाडकी बहिण योजना अशा योजनांच्या आवश्यकतेवरही त्यांनी भर दिला.

दिनांक: २७/०९/२०२४
स्थळ: मुख्य सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छ. संभाजीनगर.
एकूण सहभागी – १५०० पेक्षा जास्त

महाराष्ट्र उद्योग भरारी – २०२४ या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना माननीय उद्योगमंत्री श्री उदय सामंत यांनी टायर २ आणि टायर ३ शहरांबरोबरच छत्रपती संभाजीनगर विभागातील पायाभूत सुविधांचा विकास साधताना वर्धित नेटवर्क कनेक्टिव्हिटी, लॉजिस्टिक सपोर्ट आणि एमएसएमईच्या वाढीवर लक्ष केंद्रित केल्याची माहिती दिली. AURIC हे प्लग आणि प्ले सुविधा असणारे पहिले ग्रीनफिल्ड स्मार्ट औद्योगिक शहर आहे, जिथे आपण अलीकडेच 52000 कोटी रूपयांपेक्षा जास्त गुंतवणूक आकर्षित करण्यात यशस्वी झालो आहोत आणि 60000 पेक्षा जास्त रोजगार निर्माण करणार आहोत याचेही त्यांनी कौतुक केले. औद्योगिक क्षेत्रांना पाठिंबा देण्यासाठी सीएमईजीपी, पीएम विश्वकर्मा, लाडकी बहिण योजना अशा योजनांच्या आवश्यकतेवरही त्यांनी भर दिला.

या कार्यक्रमात गृहनिर्माण आणि इमाव कल्याण मंत्री श्री अतुल सावे, मा.श्री अब्दुल सत्तार अल्पसंख्याक विकास मंत्री आणि औकाफ मंत्रालय पणन मंत्रालय आणि पालकमंत्री छ.संभाजीनगर, मा. खासदार श्री कल्याण काळे आणि डॉ भागवत कराड, श्री पी डी मलिकनेर, एमडी, एआयटीएल यांनी देखील या क्षेत्रातील उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

दिनांक : २१.०९.२०२४
स्थळ: ठाणे

एमएमआर ठाणे विकास परिषद २०२४मध्ये मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि ठाणे क्षेत्रातील क्षमता प्रदर्शित करण्यात आल्या. मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिषदेला संबोधित करताना, मुंबई महानगर क्षेत्र ही १.५ ट्रिलियन अमेरिकन डॉलर मूल्याची अर्थव्यवस्था होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि या विकासामध्ये ठाण्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अटल सेतू, सागरी महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग विस्तार अशा अलीकडच्या पायाभूत सुविधांच्या विकासावरही त्यांनी भर दिला. या परिषदेत वरिष्ठ सरकारी अधिकारी, व्यापारी आणि जागतिक बँकेचे प्रतिनिधी सहभागी झाले. या परिषदेत रौनक ग्रुपचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष यांच्या योगदानाची दखल घेण्यात आली. ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रशांत रोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

दिनांक : २०.०९.२०२४
ठिकाण: अमरावती

आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात अमरावती येथे पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रीजन अँड अपेरल (पीएम मित्रा) पार्कची पायाभरणी केली. महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळातर्फे (MIDC) 1000 एकर क्षेत्रावर विकसित केले जाणारे हे उद्यान भारताला जागतिक कापड उत्पादनाचे आणि निर्यातीचे केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. अशा सात पीएम मित्रा पार्कच्या उभारणीला सरकारने दिलेली मान्यता ही सरकारची या कामी वचनबद्धता अधोरेखित करणारी आहे. मजबूत वस्त्रोद्योग क्षेत्र आणि दर्जेदार कापूस उत्पादनासाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या विदर्भासह महाराष्ट्र राज्य औद्योगिक वाढीच्या दृष्टीने सुस्थितीत आहे. राज्यातील निर्यातीला चालना देण्यासाठी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी शेतीपासून फायबरपर्यंत संपूर्ण पुरवठा साखळी तयार करण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. या औद्योगिक प्रगतीला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र आधुनिक पायाभूत सुविधा आणि जोडणी या बाबींवर सक्रियपणे काम करत आहे.

दिनांक : ०५.०९.२०२४
ठिकाण: यशोभूमी, नवी दिल्ली

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (DPIIT) ‘उद्योग समागम’ चे यशस्वी आयोजन केले. या ऐतिहासिक परिषदेने उद्योग आणि वाणिज्य मंत्री, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील वरिष्ठ अधिकारी तसेच प्रतिष्ठित अतिथींना एका मंचावर आणून औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी, उद्योग सुलभता वाढवण्यासाठी आणि देशभरात व्यवसायासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी विचारमंथन केले.

या कार्यक्रमात श्री पियुष गोयल यांनी रेग्युलेटरी कम्प्लायन्स बर्डन (RCB) पुस्तिकेचे प्रकाशन केले. या पुस्तिकेत उद्योग परिचालनात अडथळा आणणाऱ्या कालबाह्य नियमांचे सुलभीकरण, डिजिटलीकरण आणि कालबाह्य नियम रद्द करण्यासाठी सरकारच्या चालू असलेल्या प्रयत्नांचे प्रदर्शन करण्यात आले. व्यवसाय उद्योग आणि नागरिकांशी संबंधित ४२,००० पेक्षा जास्त अनुपालन अटी रद्द करण्यात आल्या असून त्यात ३८०० पेक्षा जास्त तरतुदींचे वैधीकरण आणि अनावश्यक कायदे काढून टाकणे समाविष्ट आहे. ही RCB पुस्तिका उद्योग सुलभता सुधारण्याच्या आणि उद्योगांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.

दिवसभर चाललेल्या या परिषदेत १६ राज्यांचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री तसेच इतर राज्यांमधले वरीष्ठ अधिकारी सहभागी झाले.

दिनांक : ०८.०२.२०२४
ठिकाण: हॉटेल टिपटॉप प्लाझा, पुणे

पुण्यातील हॉटेल टिप टॉप इंटरनॅशनल येथे ८ फेब्रुवारी २००८ रोजी महाराष्ट्राचा प्रतिष्ठित राज्य निर्यात पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात ख्यातनाम निर्यातदारांना निर्यात पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी अनेक गुंतवणूकदार आणि तज्ञ संस्थांसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी समारंभही आयोजित करण्यात आला.

एकूण १२० पुरस्कार विजेत्यांना प्रतिष्ठित निर्यात पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

या कार्यक्रमादरम्यान एकूण २७ संस्थात्मक सामंजस्य करार आणि १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.